महाराष्ट्रराजकीय

*गुलाल कोणाचा ? …सावे, वाढेगाव, चिकमहुद, खवासपूर ग्रामपंचायतीसाठी आज मतदान*

 

सांगोला तालुक्यातील सावे, वाढेगाव, चिकमहुद, खवासपूर या 4 ग्रामपंचायतीच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाची निवडणुक प्रकिया सुरु असून आज रविवार दि.5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून उद्या सोमवार दि.6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. सरपंच पदाच्या 4 जागेसाठी 11 तर 50 जागासाठी 113 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असून यापुर्वीच वाढेगाव ग्रामपंचायतीची 1 जागा तर ह.मंगेवाडी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीतील 1 जागा बिनविरोध झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मतदारांची प्रत्यक्ष भेट होत नसेल तर फोन, मेसेजद्वारे मतदारापर्यंत भूमिका पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू होता. सर्वच प्रकारे उमेदवारांनी मतदारांजवळ जाण्यासाठी कस लावला. आता आज प्रत्यक्ष मतदानाची रणधुमाळी असणार आहे. ग्रामपंचायतींसाठी आज सकाळी साडे सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात आहे. या मतदानासाठी प्रशासनाकडून पूर्णपणे तयारी करण्यात आली आहे.

 

सावे व वाढेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी दुरंगी लढत होणार आहे. तर चिकमहुद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी तिरंगी लढत तर खवासपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी चौरंगी लढत होणार आहे. सावे ग्रामपंचायतीच्या 11 जागेसाठी 23 उमेदवार, वाढेगांव ग्रामपंचायतीच्या 13 सदस्यांच्या जागेसाठी 28 उमेदवार, चिकमहूद ग्रामपंचायतीच्या 14 जागेसाठी 35 उमेदवार तर खवासपूर ग्रामपंचायतीच्या 11 जागेसाठी 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

https://chat.whatsapp.com/FXgdT4HLRrx8fhuZUr0wOz

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!