चोपडी येथील सुशांत बाबर याचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

नाझरा(वार्ताहर):- सांगोला तालुक्यातील चोपडी येथील सुशांत राजाराम बाबर या विद्यार्थ्याने पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत 298 पैकी 244 गुण मिळवत जिल्हा यादीत स्थान मिळवले आहे. चोपडी नजीक असणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय शेटफळ येथे त्याने पाचवीची शिष्यवृत्तीची परीक्षा दिली होती.यामध्ये त्याला 244 गुण मिळाले असून त्याने ग्रामीण विभागातून जिल्हा यादीत स्थान मिळवले आहे. सध्या तो नाझरा विद्यामंदिर प्रशाला नाझरा येथे सहावीच्या वर्गात शिकत आहे.त्याच्या या यशाबद्दल चोपडी परिसरातील अनेक नागरिकांकडून त्याचे कौतुक होत आहे.नाझरा विद्यामंदिर प्रशालेच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले.