सांगोला तालुकामहाराष्ट्र

वारसा आणि शाश्वत विकास या विषयावरील पुस्तकाचे सांगोला महाविदयालयात प्रकाशन

सांगोला//प्रतिनिधी : येथील सांगोला महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्यावतीने “वारसा आणि शाश्वत विकास :संधी आणि आव्हाने ” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सुप्रसिद्ध जेष्ठ कवी डॉ.सुरेश शिंदे (करमाळा), सांगोला तालुका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबुरावजी गायकवाड, सचिव श्री.म.सि.झिरपे, सहसेक्रेटरी श्री.साहेबराव ढेकळे, संस्था सदस्य श्री.सुरेश फुले, श्री. सोमनाथ ढोले(गुरुजी), श्री.सुधीर उकळे, श्री.आप्पासाहेब लेंडवे, श्री.शामराव लांडगे, प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

     महाविदयालयातील इतिहास विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या  पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालय, पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “वारसा आणि शाश्वत विकास” यावर एक दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चा सत्रामध्ये सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहणे, बीजभाषक डॉ. श्रीकांत गणवीर होते तर प्रमुख वक्ते म्हणून सोलापूर विद्यापीठातील पुरातत्त्व विभागाच्या विभागप्रमुख डॉ. माया पाटील, डॉ. विलास वाहणे,  डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. रवींद्र चिंचोळकर, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी बनारस डॉ. विराग सोनटक्के यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले, तर चर्चासत्राचे सत्र अध्यक्ष म्हणून  डॉ चंद्रकांत चव्हाण, डॉ.रविकिरण जाधव,  डॉ. संजय गायकवाड, डॉ किशोर जोगदंड यांनी काम पहिले.

 

याप्रसंगी महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून अभ्यासक यांनी आवर्जून उपस्थिती लावलेली होती. सदर चर्चासत्राकरिता शोधनिबंध मागविण्यात आले होते. त्यापैकी निवडक शोधनिबंधाचे संपादन डॉ.सदाशिव देवकर, डॉ.विलास वाहणे, डॉ.महेश घाडगे यांनी केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!