क्राईम

नाझरा ते आटपाडी रोडवर दूध घालून मोटरसायकलवरून परत येत असताना अपघात; एक ठार

सांगोला (तालुका प्रतिनिधी): दूध घालून मोटरसायकलवरून परत येत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणार्‍या चारचाकी वाहनाने जोराची धडक दिल्याने एकजण ठार झाला असल्याची घटना नाझरा ते आटपाडी रोडवरील चव्हाण वस्तीजवळील घडली. यामध्ये अजय चव्हाण रा. नाझरा ता. सांगोला असे अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तर मल्हारी चव्हाण रा. नाझरा हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी संतोष चव्हाण यांनी चारचाकी वाहनाच्या अज्ञात चालकाविरुध्द सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नाझरा ता. सांगोला येथील मल्हारी चव्हाण मोटरसायकलवरून करून पुतण्या अजय सुभाष चव्हाण असे दोघेजण नाझरा येथे दूध घालण्यासाठी गेले होते. दूध घालून परत घरी येत असताना नाझरा ते आटपाडी रोडवरील खंडोबा मंदीरापासून 200 मीटर अंतरावर इदगाह मैदानाजवळ आले असता पाठीमागून येणार्‍या चार चाकी वाहनावरील अज्ञात चालकाने भरधाव वेगाने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात मल्हारी चव्हाण व अजय चव्हाण असे दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून अजय चव्हाण हा उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. तर जखमी मल्हारी चव्हाण यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!