सांगोला तालुका

फॅबटेक पब्लिक स्कूलचे इलेमेंटरी  परीक्षेत शंभर टक्के यश

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनि. कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी इलेमेंटरी परीक्षेत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास   होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांच्या अंगभूत कला गुणांचा ही विकास होणे गरजेचे असते , स्कूलचे प्राचार्य सिकंदर पाटील यांच्या मार्गदर्शनातून फॅबटेक स्कूल मधील 27 विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या इलेमेंटरी परीक्षेत यश संपादन करून स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला .या चित्रकला ग्रेड परीक्षेमध्ये कुमारी  अनुष्का बाळू केदार व कुमारी वेदिका प्रकाश माने या विद्यार्थिनींना ब श्रेणी प्राप्त झाली.

यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन स्कूलचे कलाशिक्षक श्री अविनाश जावीर व सौ कोमल पवार यांनी केले यशस्वी  विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर ,मॅनेजिंग डायरेक्टर प्रा. डॉ. अमित रुपनर ,एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री दिनेश रुपनर ,कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे, स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .तसेच सर्व शिक्षकवृंदाने हे यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!