महाराष्ट्र

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) इतिहासातील सर्वात मोठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) इतिहासातील सर्वात मोठी जाहीरात शुक्रवारी (ता.२०) प्रसिद्ध करण्यात आली आहे. गट ब आणि क संवर्गातील तब्बल आठ हजार १६९ पदांची भरती करण्यात येणार आहे. ३० एप्रिल २०२३ रोजी संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन एमपीएससीच्या वतीने जिल्हा केंद्रांवर करण्यात येणार आहे.

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात ७५ हजारांची पदभरती करण्यात येणार असल्याची घोषणा राज्यशासनाने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच सरकारी विभागांत रिक्त पदांच्या भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, एमपीएससीच्या वतीने विविध संवर्गांसाठी ही मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

 

यात सर्वाधिक पदे ही लिपीक व टंकलेखक संवर्गातील आहे. बुधवार (ता.२५) पासून विद्यार्थ्यांना आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज करण्यात येणार आहेत. या पदभरतीसाठी वयोमर्यादा १ मे २०२३ पर्यंतची गृहीत धरण्यात येईल. अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

 

अर्ज करण्याची मुदत ः १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी

– ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची मुदत ः १४ फेब्रुवारी

– भारतीय स्टेट बॅंकेत चलनाची प्रत देण्याची मुदत ः १६ फेब्रुवारी

– चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत ः १९ फेब्रुवारी

– संयूक्त पूर्व परीक्षा २०२३ ः ३० एप्रिल

– गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा ः २ सप्टेंबर २०२३

– गट क संयुक्त मुख्य परीक्षा ः ९ सप्टेंबर २०२३

 

 

पदभरतीचा गोषवारा

संवर्ग ः एकूण पदे

१) सहायक कक्ष अधिकारी ः ७० (मंत्रालय) , ८ (लोकसेवा आयोग)

२) राज्य कर निरीक्षक ः १५९

३) पोलीस उपनिरीक्षक ः ३७४

४) दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षक ः ४९

५) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क ः ०६

६) तांत्रिक सहायक ः ०१

७) कर सहायक ः ४६८

८) लिपिक टंकलेखक ः ७०३४

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!