पुन्हा हिट अँड रन; भरधाव ऑडीची रिक्षांना धडक, रिक्षांचा चेंदामेंदा, आरोपी फरार

काही दिवसांपूर्वी घडलेल्या हिट अँड रन प्रकरणानं संपूर्ण देश हादरलेला. अशातच आता पुन्हा एकदा आणखी एका हिट अँड रन (Hit And Run Accident) प्रकरणानं मुंबई (Mumbai Accident) हादरली आहे. मुंबईतील मुलुंडमध्ये (Mulund News) हिट अँड रनची घटना घडली आहे. एका ऑडी कारनं दोन रिक्षाचालकांना धडक दिली आहे. यामध्ये चालक आणि प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. एका रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अपघातानंतर ऑडी चालकानं घटनास्थळावरुन पळ काढल्याची माहिती मिळत आहे.

मुलुंडमध्ये सकाळीच घडलेल्या हिट अँड रनच्या घटनेनं खळबळ माजली आहे. भरधाव ऑडी कारनं दोन रिक्षाचालकांना धडक दिली आहे. अपघातानंतर ऑडी चालक घटनास्थळावरुन फरार झाल्याची माहिती मिळत आहे. मुलुंड पोलिसांनी गाडी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. तसेच, चालकाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. अपघातात प्रवासी आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच, एका रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

पिंपरीमध्ये महिला जखमी                     

मुंबईप्रमाणेच पिंपरी  चिंचवडमध्ये हिट अँड रनचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सुदैवानं यात एक महिला थोडक्यात बचावल्या आहेत, मात्र त्या जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पिंपरी गावात हा प्रकार काल दुपारी घडला. रस्त्याच्या बाजूनं चाललेल्या महिलेला कारनं समोरून येत धडक दिली. त्यानंतर कार चालक पसार झाला. प्रत्यक्षदर्शींनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो हाती लागला नाही. आता पिंपरी पोलीस त्या चालकाचा शोध घेत आहे.

    

शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याच्या मुलानं मद्यधुंद अवस्थेत आपल्या भरधाव बीएमडब्ल्यू कारनं दुचाकीवरुन जाणाऱ्या दाम्पत्याला उडवलं होतं. या अपघातात महिलेचा गाडीखाली चिरडून मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोपी फरार झाला होता. तीन दिवसांनी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. सध्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर खटला सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button