राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मोठ्या उत्साहात संपन्न.; कार्यसम्राट मा.आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या शुभहस्ते प्रकाशन सोहळा संपन्न.

सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या शुभहस्ते दि. 4 जानेवारी रोजी राष्ट्रवादी भवन सांगोला येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या सांगोला शहरातील पदाधिकाऱ्यांनी आबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अतिशय सुंदर असे साहित्य व योग्य अशी मांडणी दर्जेदार करत दिनदर्शिका बनवली आहे ही दिनदर्शिका पाहून आबांनी कार्यकर्त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मारत कौतुक केले.
राष्ट्रवादी शहर युवक काँग्रेस यांच्यावतीने अतिशय दर्जेदार अशी दिनदर्शिका माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त काढण्यात आली या दिनदर्शिकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष ज्येष्ठ नेते तानाजीकाका पाटील, सांगोला नगरपालिकेचे गटनेते सचिन उर्फ सोमनाथ लोखंडे, युवक शहराध्यक्ष रवी चौगुले, राहुलदादा क्षीरसागर, प्रा. मनोज उकळे, महेश गुरव, प्रताप शिंदे, उमेश गुरव, अमन इनामदार, नितीन काळे, शैलेश स्वामी, राहुल व्हटे, स्वप्नील शिंदे, राजेंद्र देशमुख, उमेश व्हटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.