सांगोला तालुका

सांगोला नगरपरिषद महिला व बाल कल्याण विभागाकडून शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम संपन्न 

सांगोला नगरपरिषद महिला व बाल कल्याण विभागा अंतर्गत दरवर्षी महिला व बालक यांच्या विकास व सक्षमीकरनासाठी विविध योजना व कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. या समिती अंतर्गत  या वर्षी आयोजित 10वी व 12वी च्या मुलींचा शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील तरतुदीनुसार   प्रत्येक अ व ब वर्ग नगरपरिषदाना  महिला व बालकल्याण समिती स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच क वर्ग नगरपरिषदाना आवश्यकतेनुसार समिती स्थापन करता येईल अशी तरतूद करण्यात आली आहे.त्यानुषंगाने राज्य शासनाद्वारे महिला व बालकल्याण कार्यक्रमासाठी नगरपालिकांनी त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेल्या वार्षिक उत्पन्नाच्या बांधील खर्च वजा जाता उर्वरित रकमेच्या 5% रक्कम राखून ठेवण्याबाबत  निर्णय घेण्यात आला आहे .महिलांना सर्वच क्षेत्रांत सक्षम करण्यासाठी सदर खर्च विविध योजना व कार्यक्रम करण्यासाठी मार्गदर्शक सूचना ही निर्गमित करण्यात आल्या आहेत.
सांगोला नगरपरिषदेच्या 5 विषय समित्या असून त्यापैकी एक समिती महिला व बाल कल्याण विकास समिती आहे.या समिती मार्फत दरवर्षी महिला व बालकांच्या विकासासाठी विविध योजना व कार्यक्रम राबविले जात असतात.
सांगोले नगरपरिषदेच्या या महिला व बालकल्याणाच्या या योजनेतुन प्रत्येक वर्षी 10व 12च्या मुलींना शिष्यवृत्ती वाटप   करण्यात येते.सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील सांगोला शहरातील एकूण 7शाळा व महाविद्यालय यांचे मार्फत 10व 12त प्रथम, द्दीतीय व तृतीय क्रमांक मिळवण्याऱ्या मुलींची माहिती मागवण्यात आली होती. यातूनच शहरातील एकूण 42विद्यार्थिनीची या शिष्यवृत्ती साठी निवड करण्यात आली असून शिष्यवृत्ती ची रक्कम थेट त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे.. प्रथम क्रमांकासाठी 5000रुपये, द्दीतीय 3000रुपये व तृतीय 2000रुपये असे, शिष्यवृत्ती चे स्वरूप असून आजरोजी एकूण 1,39,000रुपये शिष्यवृत्ती चे वितरण करण्यात आले.सदर कार्यक्रम हा सांगोला नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडला.सदर शिष्यवृत्ती वाटपाचा हेतू हा मुलींच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे  हा असून यामुळे मुलीं शैक्षणिक सक्षमीकरण  करिता हातभार लागणार आहे.तसेच मुलींना आर्थिक सहाय्य मिळाल्यास मुलींच्या उच्च शिक्षणासाठी देखील यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.
आजचे मुलींचे शिष्यवृत्ती वाटप मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी व तहसीलदार तथा प्रशासक श्री. अभिजित पाटील यांचे हस्ते करण्यात आले.यांच्या समवेत या समारंभासाठी सांगोला नगरपरिषदेच्या कार्यलयीन अधीक्षक श्री. विजय कन्हेरे , सभा अधीक्षक श्रीम. तृप्ती रसाळ,सहा. प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे, श्रीम. प्रतिभा कोरे, सर्व पालकवृंद आणि सर्व विद्यार्थिनी उपस्थित होते.

सांगोले नगरपरिषद मार्फत आयोजित शिष्यवृत्ती वाटप हे निश्चितच मुलींच्या शैक्षणिक सबलीकरणसाठी उपयुक्त ठरणार आहे. महिला व बाल कल्याण विभागा मार्फत अन्य कोणत्याही नावीन्यपूर्ण कल्पना व सुचना असल्यास नगरपरिषदेस कळवावे. त्याच्या अंमलबजावणी साठी सर्व आवश्यक प्रयत्न करण्यात येतील असा विश्वास, यावेळी मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी व्यक्त केला..

मुख्याधिकारी
नगरपरिषद सांगोले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!