पुणे विभागीय गोळा फेक स्पर्धेत पायोनियरची क. प्रतीक्षा दत्तात्रय येलपले प्रथम.

सांगोला(प्रतिनिधी): पंढरपूर येथे झालेल्या पुणे विभागीय गोळा फेक स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील गटांमध्ये पायोनियर इंग्लिश मीडियम स्कूल पायोनियर सेमी इंग्लिश स्कूलची कु. प्रतीक्षा दत्तात्रय येलपले या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकाविला. पुणे विभागाच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या स्पर्धकांमधून सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार्या प्रतीक्षाने पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळविला. प्रतीक्षाने 10.37 मी. गोळा फेकून हे यश आपल्या बाजूने खेचून घेतले.
पुणे विभागात मिळवलेल्या प्रथम क्रमांकामुळे प्रतीक्षा राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत गोळाफेक मध्ये विभागाचे नेतृत्व करणार आहे. तिच्या यशाबद्दल पायोनियर संकुलाचे संस्थापक अध्यक्ष श्री. अनिल येलपले व य. मंगेवाडी गावचे सर्व आजी माजी सरपंच, प्रतिष्ठित नागरिक सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. प्रतीक्षाच्या यशामध्ये तिचे पालक श्री. दत्तात्रेय येलपले यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अनिल येलपले, क्रीडा शिक्षक श्री. घाडगे सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रतीक्षाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रतिक्षाचे ढोल व लेझीमच्या गजरात स्वागत करण्यात आले व प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते प्रतीक्षाचा सत्कार समारंभ पार पडला.तिच्या या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.