सांगोला तालुका

सांगोला पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांचे डोंगर ट्रेकिंग संपन्न….

सांगोला तालुक्यातील कोळा येथे म्हसोबा डोंगर बानुरगड डोंगर बहिर्जी नाईक समाधी स्थळी रविवारी भल्या पहाटेच सांगोला पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कुलकर्णी साहेब व त्यांच्या टिमने कोळा नगरीत प्रवेश केला.पहाटेची अंगाला गार झोंबणारी हवा.अशा हर्षोल्लास सांगोला पोलीस टीमचे कोळ्यात आगमन‌ झाले.
वय वर्षं ५२ असलेले सांगोल्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी साहेब यांचा उत्साह एखाद्या १७ – १८ वर्षीच्या पोरांना पण लाजवेल अशा उत्साहाने ट्रेकिंगला सुरुवात झाली. ट्रेकिंगची सुरुवात सकाळी ६.१६ मिनिटांनी म्हसोबा डोंगर पायथ्याने केली.सकाळचा थंडावा मन मोहीत करणारा होता.विविध पक्षांची किलबिल व त्यांचे मंजुळ आवाज मनाला ताजे तवाने करत होते.शुध्द आणि जिवंत पाण्याचा झरा खळखळून वाहत होता.गवताची पाती डोलत नाही.सर्वानाच म्हसोबाच्या डोंगराने‌ मोहून टाकले.कोणी डोंगरावर सेल्फी घेत होते.तर काही जण कोळ्यांचा सुंदर, स्वच्छ आणि देखणा परिसर आपल्या मोबाईल मध्ये टिपत होता.
पहिला म्हसोबा ट्रेकिंग अति उत्साहात पार केले.सर्व टीमने पहिला टप्पा अतिशय ताकदीने पूर्ण केला.म्हसोबा मंदिरा जवळ थोडी विश्रांती घेऊन टीमचा पुढचा टप्पा सुरू झाला.म्हसोबाच्या डोंगर सपाटीवरून जाताना अनेक रंग बिरंगी फुले,डोलणारे गवत, विविध वनस्पती, फुलपाखरे आणि छोटे मोठे प्राणी यांची लगबग पहायला मिळत होती.रानातील रानमेवा खात खात संपूर्ण टीम आपल्या शरीराचा आणि मनाचा थकवा दूर करत गाणी, विनोद करत म्हसोबा ट्रेकिंगचा लांबचा पल्ला पूर्ण केला.म्हसोबा डोंगर ट्रेकिंग संपते न संपतेच सर्वांच्या नजरा वळल्या त्या भूपाल गडाकडे.. भूपाल गडाकडे जाण्याचा सर्वांना चंगच बांधला होता.काही पोलीसांच्या मनात शंकेची पाल कुचकुचू लागली आता अजून किती दूर आहे.? पण कुलकर्णी साहेब वय ५२ आणि ट्रेकिंग ला सर्वात पुढे असल्याने कोणीच ना चा पाढा वाचला नाही.सुरवात झाली भूपाल गडाकडे..
सर्वप्रथम मोहित्याच्या वस्त्या पार करून गेलो.छोटे छोटे ओहोळ शांत वाहत होते.सर्वाना अतिशय थंड अशा पाण्याची आपल्या चेहऱ्यावर शिंपडून फ्रेश होवून टीम ने पुन्हा जोराने ट्रेकिंग ला सुरुवात केली.खरी ट्रेकिंगची कसं काय असते ते उभा डोंगर पादाक्रांत करताना सर्वांना समजले.परंतू जय जय जय शिवाजी,हर हर महादेवच्या घोषणा देतच आम्ही भूपाल गडाकडे कूच केली.भूपाल गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्तहेर संघटनेने प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या समाधीचे दर्शन घेतले.तसेच शंभू महादेवाचे दर्शन घेऊन आमचा पायी प्रवास पुन्हा सुरू झाला.अतिशय उत्साहात हसत ,खेळत,बागडत भूपाल गड – टेंभू कालवा ते पुन्हा म्हसोबा पायथा असा तब्बल १४.८ कि.मी.प्रवास ३ ते ३.३० तासात अतिशय उत्साहाने पूर्ण केला  ट्रेकिंग हे आता कोळ्यांची वैभवात नक्कीच भर घालेल यात दुमत नाही..
यावेळी त्यांच्यासमवेत नाझरा बीटचे एपीआय हेमंत कुमार काटकर, कोळा बिटचे एपी आय आदिनाथ खरात, पोपट काशीद, प्रशांत हुल्ले,  अमलदार गणेश कुलकर्णी, पत्रकार जगदीश कुलकर्णी, आनंद आलदर सर, सचिन वाघ, अमर पाटील, पोलीस पाटील मदन आलदर, प्रवीण हातेकर यांच्यासह सांगोला पोलीस स्टेशनचे जवळपास ४०  पोलीस कॉन्स्टेबल सर्व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!