राजकीयसांगोला तालुका

 बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडीच्या वतीने खेळ पैठणीचा कार्यक्रम साजरा; ऐश्वर्या जाधव ठरली पैठणीची मानकरी.

कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना महिलांनी स्वतःसाठी देखील वेळ देणे महत्त्वाचे : रेखाताई पाटील

सांगोला तालुक्यामध्ये सध्या महिला या पुरुषांच्या बरोबरीने काम, व्यवसाय व शिक्षण घेत आहेत. महिला जरी व्यवसाय व काम करत असल्या तरी त्यांना घरातील जबाबदाऱ्या पार पाडून बाहेर  पडावे लागते. त्यामुळे महिलांना स्वतःसाठी फारसा वेळ भेटत नाही. मकर संक्राती हा महिलांसाठी अत्यंत मानाचा सण असल्याने आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडीच्या वतीने रोजच्या जीवनातून महिलांना थोडाफार मनोरंजनासाठी वेळ भेटावा म्हणून सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांनी या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घ्यावा व त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या शिवसेना महिला आघाडी यांच्याशी संपर्क साधून सोडविण्याचा प्रयत्न करावा आमदार शहाजी बापू पाटील हे आपल्या माय भगिनींच्या सेवेसाठी कायम तत्पर असतील. असे मत आमदार शहाजी बापू पाटील यांच्या सौभाग्यवती रेखाताई पाटील यांनी व्यक्त केले.
सोमवार दिनांक 23 जानेवारी रोजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान रूपमती साळुंखे यांनी भूषवले असून, व्यासपीठावर शीलाताई झपके, वृषाली पाटील तेजस्विनी इंगवले, राजलक्ष्मी पाटील, राणी पाटील, पंचायत समिती सदस्य वंदना गायकवाड रूपाली लवटे, शोभा  देशमुख, राजलक्ष्मी लोखंडे, आशा यावलकर शोभा घोंगडे, ज्योती घोंगडे, सीमा इंगवले, प्रतीक्षा बनसोडे, प्रेमलता रोंगे, डॉक्टर स्नेहा रोंगे, वंदना रोंगे यांची प्रमुख उपस्थिती होती
या कार्यक्रमांमध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या महिलांना आकर्षक भेटवस्तू तसेच उपस्थित महिलांमधून 11 लकी ड्रॉ क्रमांक काढून सदरच्या 11 महिलांना कुकर व ग्लास सेट भेट देण्यात आला आहे तसेच उपस्थित सर्व महिलांना भेटवस्तू देण्यात आली आहे.
या कार्यक्रमांमध्ये महिलांना म्हशींच्या जातीची पाच नावे, महाराष्ट्रातील पाच नद्यांची नावे, ट्रॅक्टरच्या पाच कंपन्यांची नावे, महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांची नावे, महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची नावे, समुद्रकिनाऱ्यांची नावे असे खोचक प्रश्न  विचारून त्याची पटकन उत्तरे देणाऱ्या महिलांना पुढील गटात सहभागी करण्यात आले होते तसेच काळा गोळा गोरा गोळा असे पटकन जीभ न वळवणारे शब्द पटापट बोलणे महाराष्ट्रीयन अभिनेत्रींची माहिती असे बरेचसे खेळ यामध्ये रंगले होते अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या महिलांना अंतिम क्षणी संगीत खुर्ची खेळावयास लावून त्यामधून प्रथम क्रमांकाची निवड करण्यात आली होती.
या शुभ दिनी राजलक्ष्मी पाटील व सागर दादा पाटील यांच्या लग्नाचा व त्यांच्या चिरंजीवाचा देखील वाढदिवस असल्याने व्यासपीठावर त्यांचा वाढ दिवस देखील साजरा करून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या
या कार्यक्रमांमध्ये स्वतः रेखाताई पाटील रूपमती साळुंखे राजलक्ष्मी पाटील यासह इतर प्रमुख उपस्थिती मान्यवरांनी देखील फुगडी खेळून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सदरचा सदरच्या कार्यक्रमास सांगोला शहर व तालुक्यामधून हजारोंच्या संख्येने महिलांनी आपली उपस्थिती दर्शवून सर्व महिला खेळामध्ये सहभागी झाल्या होत्या हा कार्यक्रम राजलक्ष्मी पाटील यांच्या नियोजनाखाली बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडीच्या सर्व सदस्य महिलांच्या प्रयत्नातून यशस्वीरित्या पार पडला हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी  आरती देशमुख, पुनम सावंत, श्वेता पवार, दिपाली माने, राणी चव्हाण, विद्या पवार, शुभांगी शेंडे, करुणा जांभळे, निकिता पाटील, मनीषा लिगाडे, मंजुषा लिगाडे यांनी अथक परिश्रम घेतले

 

सदरच्या आयोजित खेळ पैठणीचा या कार्यक्रमांमध्ये प्रथम क्रमांक ऐश्वर्या जाधव यांनी पटकावून मानाची पैठणी व सोन्याची नथ हे बक्षीस जिंकले आहे सदरचे बक्षीस हे सचिन ज्वेलर्सचे चालक सचिन मिसाळ यांच्याद्वारे देण्यात आले द्वितीय क्रमांक रूपाली पाटील यांनी पटकावून मायक्रो ओवन या बक्षिसाच्या त्या मानकरी ठरल्या तृतीय क्रमांकाचे गॅस शेगडीचे बक्षीस हे दिपाली दौंडे यांनी पटकाविले तर चतुर्थ क्रमांक हा पुष्पा अरबळी व अश्विनी कांबळे यांनी पटकविला असून या दोघींनाही इलेक्ट्रिक शेगडी बक्षीस म्हणून देण्यात आली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!