रोटरी क्लब सांगोला यांचे तर्फे सोलापूर व सातारा या दोन जिल्ह्यांतील ३२ क्लब सदस्यांसाठी सदस्यत्व अभिमुखता मंच ओरिएण्टेशन फोरम संपन्न

रोटरी क्लब ऑफ सांगोला यांचे तर्फे रविवार, दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी, सकाळी १०.०० ते दुपारी ३.३० या वेळेत हॉटेल ज्योतिर्लिंग, वाढेगाव नाका ,सांगोला येथे – सोलापूर व सातारा जिल्ह्यातील सदस्यांसाठी सदस्यत्व अभिमुखता मंच ओरिएण्टेशन फोरमचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी सोलापूर व सातारा जिल्ह्यातील जवळपास 32 क्लबचा सहभाग मिळाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रांतपाल रो.सी.ए. रवीकिरण कुलकर्णी सांगली, माजी प्रांतपाल रो.विष्णू मोंढे सोलापूर व माजी प्रांतपाल रो.इंजी. मोहन देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच वक्ते म्हणून रो.सी.ए.नितीन कुदळे अकलूज, रो.इंजि.प्रमोद शिंदे वाई, रो.सुहास शामराज बार्शी, रो.डाॅ.सुभाष पाटील माढा, रो.इंजि. यशवंत हांडे टेंभुर्णी व रो.इंजी.हमीद शेख सांगोला यांनी आलेल्या सदस्यांना मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुण्यांनी नवीन सदस्या बरोबरच जुन्या सदस्यांना देखील अशा ट्रेनिंगची गरज आहे तसेच रोटरीच्या सर्व Avenue बद्दल पूर्णतः माहिती असणे गरजेचे आहे असे सांगितले.या कार्यक्रमाला 50 रोटरी सदस्यांनी सहभाग नोंदवला.
कोविड-19 नंतर गेल्या तीन वर्षांतील सदस्यांसाठी आणि निवडक अध्यक्ष/सचिवांसाठी एकाच छताखाली अनेक नामवंत वक्त्यांकडून रोटरी चे चांगले ज्ञान मिळवण्याची ही एक चांगली सुवर्ण संधी मिळाली.या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब सांगोला चे फोरम लीडर रो.इंजि.हमीद शेख , कनव्हेनर रो.इंजि.मधुकर कांबळे, अध्यक्ष रो. दत्तात्रय पांचाळ, सचिव रो. इंजि.विकास देशपांडे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच रो. इंजि. विलास बिले, रो प्रवीण मोहिते,रो.महेश गवळी, रो.इंजिन.अशोक गोडसे व सांगोला रोटरी क्लबचे सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाला रोटरी क्लब सांगोला, रोटरी क्लब पंढरपूर,रोटरी क्लब माढा,रोटरी क्लब टेंभुर्णी,रोटरी क्लब वाई,रोटरी क्लब सोलापूर,रोटरी क्लब सातारा,रोटरी क्लब अकलूज, रोटरी क्लब करकंब, या क्लब नी भाग घेतला .
या कार्यक्रमाला सांगोला रोटरी क्लबचे रो डॉ प्रभाकर माळी, रो सीए के एस माळी, रो. दीपक चोथे, रो इंजि. संतोष भोसले,रो. ऍड. विशाल बेले, डॉ. मच्छिंद्र सोनलकर,रो. इंजि. संतोष गुळमीरे, रो.साजिकराव पाटील सर,रो. गोविंद दादा माळी, रो.इंजि. बाळासाहेब नकाते,रो. ऍड. सचिन पाटकुलकर, रो. इंजि. रमेश जाधव, रो. अरविंद डोंबे गुरुजी, रो मनोज ढोबळे,रो. महादेव कोळेकर, इत्यादी रोटरी सदस्य हजर होते.
सांगोला क्लबने केलेल्या आयोजनाबद्दल व व्यवस्थेबद्दल सर्वांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो.ऍड. गजानन भाकरे यांनी केले, प्रास्ताविक रो. दत्तात्रय पांचाळ सर व आभार प्रदर्शन रो. इंजि. विकास देशपांडे यांनी केले.