सांगोला तालुका

नाझरे येथील महासोमयाग यज्ञीय कार्यक्रमातभाविकांचा उस्फूर्त सहभाग

श्री क्षेत्र नाझरे येथे संपन्न होत असलेल्या सोमयागाच्या चौथ्या दिवशी यज्ञ मंडप भाविकांनी फुलून गेला. सकाळ सत्रामध्ये दोन प्रवर्ग्य गणेश याग,चंडी याग व सत्यम्बा पूजन असे विविध यज्ञ संपन्न झाले. दुपार सत्रामध्ये दहा फूट खोल आठ फुट व्यासाच्या मोठ्या यज्ञकुंडात आहुतीनां प्रारंभ झाला.अग्निशोमीय यज्ञविधी संपन्न करताना यज्ञकुंडातील आहुती पाहण्यासाठी भाविकांनी खूप गर्दी केली.यज्ञ मंडपाचा आकार मानवी देहाच्या आकारासारखा असून यज्ञ हा मानवाच्या सर्वांगीण समृद्धीसाठी असून आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी विश्वाला दिलेली अनमोल देणगी आहे असे प्रतिपादन यज्ञ निरूपणकार श्री नाव्हेकर यांनी व्यक्त केले.
त्याने केवळ वातावरण शुद्धीच नव्हे तर त्याबरोबरच अंतःकरण शुद्धी होऊन त्याग,समर्पण,सेवा आणि निष्ठा या सद्गगुणांनी अलंकृत झालेला समाज निर्माण करणे हे यज्ञ संस्थेचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
 यज्ञेश्वर महाराजांचे जीवन यज्ञसंस्थेला अभिप्रेत असलेल्या सर्व सद्गुणांचे चालते बोलते रूप असल्यामुळे त्यांचे जीवन हाच एक महायज्ञ असल्याचे आपणास पहावयास मिळते असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले. शुक्रवार आणि नवमी तिथीचे औचित्य साधून यज्ञ मंडपात कुंकुमार्चन विधी फार मोठ्या प्रमाणात पार पडला त्यात सर्व समाजातील माता भगिनींनी उस्फूर्त सहभाग घेऊन भगवतीची ही आगळी वेगळी आराधना सौभाग्यवर्धनार्थ भगवतीच्या चरणी अर्पण केली. या यज्ञातील पुढील कुंकू मार्चन मंगळवार दिनांक 23 जानेवारी रोजी होईल असे संयोजकांनी कळविले.
मोठ्या यज्ञकुंडामध्ये (उत्तर वेदी) सोमयागाची पहिली महाआहुती जेव्हा समर्पित झाली तेव्हा अग्नीचे अतिप्रचंड प्रखर तेजस्वी रूप पाहून भाविकांचे मन हेलावून गेले त्या भव्य दिव्य प्रकाश रुपी परमेश्वराला पाहून सर्व भाविकांचे हात आपोआप जोडले गेले अशी महाआहुती प्रथमच पाहिल्याचे अनेक भाविकांनी सांगितले.
 रात्री हरिभक्त परायण श्री.पद्मनाभ व्यास महाराजांचे “कोटी जन्म आम्ही करू हरी कथा।कर्मकांड माथा धरूनिया।।” या संत एकनाथ महाराजांच्या अभंगावर अत्यंत अभ्यासपूर्ण कीर्तन झाले त्यात त्यांनी भक्तिमार्ग आणि कर्ममार्ग एकमेकांना पोषक असल्याचे प्रतिपादन केले.
सर्व कार्यक्रमांना भाविकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!