सांगोला तालुकामहाराष्ट्र

रोटरी क्लब सांगोला यांच्यावतीने आयटीआय कॉलेजमध्ये वृक्षारोपण

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला तालुक्यात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने मंगळवार दि.10 ऑक्टोबर रोजी आयटीआय कॉलेजमध्ये देशी 40 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले .

या वृक्षारोपणासाठी रोपांची मदत वनखात्याकडून करण्यात आली. रो. माणिक भोसले रो. महेश नलावडे रो.शरणप्पा हल्लीसागर रो. बशीर भाई तांबोळी व सचिव सचिन पाटकुलकर तसेच त्यांचे वकील मित्र, वनखात्याचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह आयटीआय कॉलेजचे प्रा. शिकलगार सर त्यांचे सर्व प्राध्यापक वृंद व सर्व विद्यार्थी हजर होते.

आयटीआय कॉलेजने वृक्षारोपणाचा कार्यक्रम रोटरीच्या वतीने घ्यावा यासाठी सर्व खड्डे काढणे ,प्रत्येक रोपाला ठिबक सिंचन तयार करणे आदी परिश्रम घेतले व वृक्ष संवर्धनासाठी एक वेगळी चळवळ उभी केली. अशाच प्रकारे सर्व संस्थांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनासाठी पुढे यावे अशा भावना निवृत्त वन अधीक्षक माणिक भोसले यांनी व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!