सांगोला तालुका

कारवाईसाठी आणलेल्या जनावराचा नगरपालिका कोंडवाड्यात मृत्यू

सांगोला (प्रतिनिधी): मोकाट जनावरांवर नगरपालिकेने कारवाई करून कोंडवाड्यात डांबून ठेवलेल्या जनावराचा मृत्यू झाला. मागील चार दिवसापासून कोंडवाड्यात डांबून ठेवलेल्या जनावरांना चारा दिला नसल्यामुळे जनावराचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करीत, सदर म्हशीच्या पिलाचे पोस्टमार्टम करून त्या अहवालानुसार संबंधितावर कारवाई करावी असा पवित्र जनावर मालकांनी घेतला.
सांगोला शहरातील मोकाट जनावरांवर कारवाई करण्याची मोहीम सांगोला नगरपालिकेने मागील चार ते पाच दिवसापासून राबवली आहे. यादरम्यान जनावरे पकडून त्यांना कोंडवाड्यात ठेवण्यात आले आहे. यामध्ये विनोद बनसोडे यांच्या म्हशीच्या पिलाला देखील कारवाई पोटी कोंडवाड्यात ठेवण्यात आले होते. त्या  पिलाचा  कोंडवाड्यात मृत्यू झाला.
मयत जनावरांचे पोस्टमार्टम होवून संबंधीतावर कायदेशीर कारवाई करावी. याबाबत जिल्हाधिकारी सोलापूर, तहसीलदार सांगोला व मुख्याधिकारी सांगोला यांच्याकडे मागणी करण्यात आली असल्याचे श्री.विक्रम बनसोडे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!