नाझरे येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक गणपत जावीर गुरुजी यांचे निधन

सांगोला(प्रतिनिधी):- नाझरे येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक गणपत संभू जावीर (गुरुजी) यांचे काल मंगळवारी पहाटेच्या सुमारास वृध्दापकाळाने निधन झाले.निधनासमयी त्यांचे वय 84 वर्षे होते. कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे येथील वरिष्ठ लेखाधिकारी श्री.विजयकुमार जावीर यांचे ते वडील होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 4 मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवस विधी गुरुवार दि.2 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 वाजता नाझरे येथे होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या निधनामुळे नाझरे व परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.