ऋतुजा कांबळे जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम

नंदेश्वर ता मंगळवेढा श्री बाळकृष्ण विद्यालयातील इयत्ता दहावीमध्ये शिकत असणारी ऋतुजा भागवत कांबळे हिने वयोगट १७ मधून ३०ते३५ किलो वजन गटात नुकत्याच सोलापूर-मोडनिंब येथे झालेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केलेले असुन ऋतुजा कांबळेची पुणे विभागीय स्तरावर कराटे स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत ऋतुजा हिने कराटे स्पर्धेमध्ये यश मिळवलेले आहे.तिला मार्गदर्शन प्रशालेतील सहशिक्षक शरद कांबळे,विठ्ठल एकमल्ली,मनोहर बंडगर,गिरीश चौगुले,नवनाथ मेटकरी यांनी केले असून मार्गदर्शक शिक्षकांचे व यशस्वी विद्यार्थिनीचे अभिनंदन समर्थ सद्गुरु बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज,श्री बाळकृष्ण विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य भारत बंडगर यांच्यासहित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक व ग्रामस्थांनी केलेली आहे.