फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात संपन्न

सांगोला:आपल्या राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचं संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून फॅबटेक टेकनीकल कॅम्पसच्या अभियांत्रिकी व पॉलीटेक्नीक या विद्याशाखा मध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला .यामध्ये ग्रंथप्रदर्शन, निबंध स्पर्धा, व्याख्यान यांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथम सत्रात ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन प्रमुख पाहुणे माजी शिक्षक श्री महादेव घोंगडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी डिग्री अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ रवींद्र शेंडगे व डिप्लोमा अभियांत्रिकीचे प्राचार्य प्रा. शरद पवार, व सर्व विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. द्वितीय सत्रात प्रमुख पाहुणे माजी शिक्षक श्री महादेव घोंगडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी मराठी भाषा हि केवळ संवाद साधण्याचे माध्यम नसून जगणे सुंदर करण्यासाठी
काम करत असते.यावेळी त्यांनी संत ज्ञानेश्वर माउलींच्या पसायदानातील दाखले दिले. तृतीय सत्रात मराठी भाषादिनानिमित्त निबंध स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या होत्या . या स्पर्धे मध्ये डिग्री विभागातून दिक्षा कांबळे आणि डिप्लोमा विभागातून प्रशांत लोहार व मयुरी कांबळे यांनी सहभाग नोंदवला .
हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन श्री. भाऊसाहेब रुपनर व मॅनेजिंग डायरेक्टर श्री अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे, यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. सदरचा कार्यक्रमासाठी अकॅडमिक डीन डॉ. धायगुडे, प्रा.तात्यासाहेब जगताप, डिग्री अभियांत्रिकीचे सांस्कृतीक विभाग प्रमुख प्रा अमोल मेटकरी व डिप्लोमा अभियांत्रिकी सांस्कृतीक विभाग प्रमुख प्रा संगीता खंडागळे, डिग्री अभियांत्रिकीचे ग्रंथपाल सुधीर माळी, डिप्लोमा अभियांत्रिकीचे ग्रंथपाल मोहन लिगाडे,सहाय्यक ग्रंथपाल नेताजी मस्के तसेच सर्व विभागप्रमुख, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे ससूत्रसंचालन व आभार प्रा वैशाली मिस्कीन यांनी केले.