सांगोला तालुकामहाराष्ट्र

सांगोला नगरपरिषद अंतर्गत बचत गटातील महिलांसाठी दोन दिवसीय बचत गट संकल्पना प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन

दि.अं.यो.राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) ही केंद्र पुरस्कृत योजना सांगोला नगरपरिषद राबवित आहे. सदर योजना ही शहरी दारिद्र्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सन २०१४-१५ पासून कार्यान्वीत झालेली आहे.  योजनेच्या माध्यमातून शहरातील दारिद्र्य रेषेखालील महिलांचे जीवनमान उंचविण्याच्या दृष्टीने नगपरिषदस्तरावर महिला बचत गटांची स्थापना करण्यात येते. या अनुषंगाने शहरामध्ये आज 200 पेक्षा जास्त बचत गट कार्यरत आहेत. या बचत गटांमध्ये महिलांचा बचत गट, सफाई कर्मचारी यांचा बचत गट तसेच दिव्यांग बांधवांचे बचत गटांचा समावेश होतो.
सदर योजनेच्या माध्यमातून १० ते १५ बचत गटांचा मिळून एका वस्तीस्तर संघाची स्थापना करण्यात येते.व  दोन पेक्षा जास्त वस्तीस्तर संघ मिळून शहरस्तर संघाची स्थापना केली जाते. याप्रमाणे सांगोला शहरामध्ये ०१ शहरस्तर संघ व ९ वस्तीस्तर संघ कार्यरत आहेत. वस्तीस्तर संघ व शहरस्तर संघ बाबत संकल्पना स्पष्ट होण्याच्या दृष्टीने दि.३० व ३१ जानेवारी २४  रोजी  बचत गटातील महिलांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणाचे उद्घाटन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रशिक्षणासाठी पहिल्या दिवशी प्रशिक्षक म्हणून श्री महेश साठे,पंचायत समिती सांगोला यांनी तर दुसऱ्या दिवशी श्री उमेश डांगे, पंचायत समिती मंगळवेढा यांनी प्रशिक्षक म्हणून उपस्थित बचत गटातील महिलांना मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणामध्ये वस्तीस्तर संघ, शहरस्तर संघ व समुदाय संसाधन व्यक्ती असे एकूण ४० महिलांचे दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन नगरपरिषद सभागृह येथे करण्यात आले. सदर प्रशिक्षणामध्ये बचतगट, वस्तीस्तर संघ व शहर स्तर संघ संकल्पना,व्यवस्थापन  व शाश्वत उपजीविका याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
सदर प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सहा.प्रकल्प अधिकारी श्री योगेश गंगाधरे, समुदाय संघटक श्री बिराप्पा हाक्के, शहर उपजीविका केंद्र व्यवस्थापक श्री शरद थोरात व सौ.जयश्री खडतरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
———————–
राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून महिलां फक्त आर्थिकदृष्ट्या नाहीतर सामाजिकदृष्ट्याही सक्षम होण्याच्या  करिता नगरपरिषद नेहमीच विविध प्रशिक्षणाचे आयोजन करीत असते. येथून पुढेही महिलांच्या विकासाकरिता नगरपरिषद नेहमीच विविध शासकीय योजनांची माहिती शहरस्तर संघाच्या माध्यामतून महिलापर्यंत पोहचवत राहील
– *डॉ.सुधीर गवळी,मुख्याधिकारी तथा प्रशासक,नगपरिषद सांगोला* .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!