सांगोला तालुकामहाराष्ट्रशैक्षणिक

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत जि.प.प्राथमिक शाळा,शेळकेवाडी (शि)सांगोला तालुक्यात प्रथम*

सांगोला – महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यभरात घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत स्थानिक स्वराज्य संस्था शाळा गटातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळकेवाडी(शि) सांगोला तालुक्यात प्रथम क्रमांकाची ठरली आहे. या स्पर्धेत सांगोला तालुक्यातील जवळपास सर्वच शाळांनी सहभाग नोंदवला होता, त्यातून हे यश शाळेने मिळवले आहे. प्रथम क्रमांक आल्याने शाळेला 3 लाख रुपयाचे बक्षीस मिळणार आहे. जिल्हा परिषद शाळा शेळकेवाडी(शिवणे) ही ग्रामीण भागातील शाळा असून अत्यंत कठीण परिस्थितीत ही शाळा चालू होती. त्यातूनही शाळा टिकवून येथील शिक्षकांनी ,पालकांनी ,शालेय व्यवस्थापन समिती व विद्यार्थी परिश्रमपूर्वक व नियोजनबद्ध काम करून हे यश मिळवले आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत शाळेत विविध प्रकारची कामे करण्यात आलेले आहेत. शाळा व वर्ग सजावट, बोलक्या भिंती, आरोग्य विषयक उपक्रम, आर्थिक साक्षरता, कौशल्य विकास, पालक व विद्यार्थी सहभाग, तंबाखूमुक्त शाळा, माजी विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समिती सहभाग, वृक्ष लागवड, विद्यार्थी मंत्रिमंडळ, परसबाग,बाल बचत बँक, महावाचन चळवळ, विविध कलाविषयक उपक्रम, स्वच्छता मॉनिटर, राष्ट्रीय एकात्मता विषयक उपक्रम, क्रीडा स्पर्धा असे नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेने राबवले आहेत. शाळेत शाळा व्यवस्थापन समितीमार्फत शाळा सुशोभीकरण, फरशीकरण, किचनशेड    दुरुस्ती इत्यादी कामे लोकसहभागातून करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे  डिजिटल क्लासरूम उभारण्यात आले आहेत.
    विद्यार्थी  व्यक्तिमत्व विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले . महावाचन चळवळीच्या उपक्रमांतर्गत अवांतर वाचनाची सवय लावण्यासाठी उपक्रम सुरू आहे.  प्रयोगातून विज्ञान, ई लर्निंग डिजिटल क्लासरूम, लेखन साहित्य व स्कूल , स्पर्धा परिक्षा तयारी उपक्रम, शैक्षणिक साहित्याचा भरपूर वापर, हरित शाळा उपक्रम व स्टेज निर्मिती आदी नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून शाळेने उठावदार कार्य केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेच्या निकषानुसार घेतलेल्या विविध उपक्रम व शाळेने केलेली अंमलबजावणी याची दखल घेत तालुका स्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक शाळेला जाहीर झाले आहे.
या यशासाठी सांगोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.आनंद लोकरे साहेब  गटशिक्षणाधिकारी मा. सुयोग नवले साहेब विस्तार अधिकारी मा.लक्ष्मीकांत कुमठेकर साहेब शिवणे केंद्राचे केंद्रप्रमुख मा.सिद्धेश्वर खुळे साहेब ,मडके सर  यांचे मार्गदर्शन लाभले.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विकास वाघमोडे उपाध्यक्ष समाधान भाटेकर सर्व सदस्य, पालक व गावातील शिक्षणप्रेमी नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी व मुख्याध्यापक श्री.भागवत मच्छिंद्र भाटेकर ,सहशिक्षिका श्रीमती शितल मोहन  पोळ, अंगणवाडी ताई श्रीमती मंगलशेंडगे मॅडम व मदतनीस आक्कताई शेळके मॅडम शाळेच्या स्वयंपाकी मावशी मंगल वाघमोडे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!