सांगोला(प्रतिनिधी): येथील सांगोला महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख डॉ. अर्जुन मासाळ यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. पी.सी. झपके सर हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांनी भूषविले.
यावेळी सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष तात्यासाहेब केदार, माजी सचिव म.सि. झिरपे, कार्यकारणी निमंत्रित सदस्य शामराव लांडगे, संस्था सदस्य चंद्रशेखर अंकलगी, माजी प्राचार्य डॉ. मधुसूदन बचुटे, प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, सत्कारमूर्ती डॉ. अर्जुन मासाळ व सौ.महानंदा मासाळ (सहशिक्षिका) आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. पी.सी. झपके म्हणाले आजचे सत्कारमूर्ती डॉ. अर्जुन मासाळ यांनी छत्तीस वर्षे आपले अध्यापनाचे काम प्रामाणिकपणे केले. त्यामुळे अनेक चांगले विद्यार्थी महाविद्यालयात घडले. विद्याही विनयतेने शोभते, डॉ. मासाळ यांनी जीवनभर विनयता जपली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड म्हणाले आज चांगल्या इंग्रजी प्राध्यापकाची शिक्षण क्षेत्रात उणिव दिसते. आपल्या प्रदिर्घ सेवेनंतर डॉ. मासाळ सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागामध्ये एक पोकळी निर्माण होत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी केले. यावेळी प्रा. शामराव नवले, डॉ. रामचंद्र पवार, डॉ. विजयकुमार जाधव डॉ. पांडुरंग रुपनर, डॉ. उत्क्रांती मासाळ, सत्कारमूर्ती डॉ. अर्जुन मासाळ यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी डॉ. अर्जुन मासाळ यांचा सेवानिवृत्ती निमित्त संस्था व महाविद्यालयाचे वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष कांबळे यांनी केले. आभार डॉ. रमेश बुगड यांनी मानले. यावेळी सेवानिवृत्त प्राध्यापक, माजी कार्यालयीन अधिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.