सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल, प्राथमिक विद्यालय व पूर्व प्राथमिक विद्यालयात 75वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल, प्राथमिक विद्यालय व पूर्व प्राथमिक विद्यालयात 75वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. सां. ता. शि.प्र.मंडळाचे खजिनदार श्री.शं.बा.सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरूवातीला कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेस पुष्पहार समर्पित करण्यात आला.यावेळी संस्थेचे सहसचिव श्री.प्रशुध्दचंद्र झपके, इंग्लिश मेडिअमच्या मुख्याध्यापिका कु. सरिता कापसे, प्राथमिक विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक श्री. उदय बोत्रे, पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका कु. रोहिणी महारनवर दोन्ही माध्यमाचे सर्व शिक्षक,पाालक , विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संगमेश्वर घोंगडे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

चौकट:75 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून इंग्लिश मेडिअम स्कूल व प्राथमिक विद्यालयाच्या नवीन इमारतीचा भूमीपूजन कार्यक्रम संपन्न झाला. संस्थाध्यक्ष श्री. प्रबुध्दचंद्र झपके व सौ. शीलाकाकी झपके यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी सहसचिव श्री. प्रशुध्दचंद्र झपके, खजिनदार श्री. शं. बा. सावंत,सर्व प्रशासकीय स्टाफ, विद्यामंदिर परिवारातील सर्व आजी-माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button