सांगोला महाविद्यालयात महात्मा जोतीबा फुले यांची जयंती साजरी

सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ संचलित, सांगोला महाविद्यालयात थोर भारतीय समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे इंग्रजी विभागप्रमुख डॉ. अर्जुन मासाळ यांचे हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून, त्यांना पुष्प्हार अर्पण केला.
यावेळी डॉ. अर्जुन मासाळ म्हणाले की, महात्मा फुले यांच्या दलित, स्त्री-पुरुष समतेच्या विचाराने भारतात मोठया प्रमाणात परिवर्तन झाले. आजची पुरोगामी स्त्री घडविण्यामागे त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे कार्य भावी पिढीला प्रेरणादायी आहे.
कार्यक्रमाचे संयोजन प्रा.एस.जी.पाटील, अधिक्षक श्री. प्रकाश शिंदे व श्री. सत्यवान भोसले यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.