अचकदाणी येथील किशोर किशोरी वर्गात ‘मैत्री’ याविषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न

अचकदाणी(वार्ताहर):-माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेमध्ये बारा ते अठरा वयोगटातील किशोरींसाठी सांगोला तालुक्यात ‘किशोरी विकास वर्ग’ सुरु आहेत. मुलीन बरोबर या वयातील मुलानाही योग्य मार्गदर्शन मिळायला हवे यासाठी संस्थेने 2018 पासून महूद येथील इंद्रजित प्राथमिक विद्यालय व अचकदानी येथील माध्यमिक विद्यालय अचकदाणी या शाळेत व गार्डी येथे किशोर वर्ग सुरु करण्यात आले. एकूण 150 मुले या वर्गाचा लाभ घेत आहेत.
गुरुवार दि. 16 फेब्रुवारी 23 रोजी अचकदानी येथील माध्यमिक विद्यालय अचकदाणी या शाळेत किशोर किशोरींसाठी मैत्री व आकर्षण याबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाला. संस्थेच्या पदाधिकारी सौ वसुंधरा कुलकर्णी यांनी मुलांना मैत्री हे नाते जन्मतःच नसते ते आपल्याला तयार करावे लागते, मग आपण मैत्री कोणाबरोबर करायची, शिक्षक हा आपला चांगला मित्र कसा असू शकतो, आई व वडील हे मुलांचे पहिले मित्र कसे असतात, तसेच मैत्रीतून निर्माण होणारे प्रेम की आकर्षण याबाबत मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे सौ संपदा दौंडे यांनी मुलींच्या आहाराबाबत व आता सुरु होणार्या परीक्षेसाठी वेळेचे नियोजन याचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर तेथे सुरु असणार्या किशोर-किशोरी वर्गातील मुलांनी तयार केलेला हस्तव्यवसाय व शाळेच्या भोवताली तयार केलेली परसबाग याची पाहणी करून मुलांचे कौतुकही केले. मुलांनीही त्यांच्या रानात तयार झालेला हरभरा, चिंच, पेरू, पपई असा रानमेवा देवून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किशोर वर्ग शिक्षक श्री दत्तात्रय धुमाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.