सांगोला शहरातील यशोदा शिवलिंग तेली यांचे निधन

सांगोला:- श्रीमती यशोदा शिवलिंग तेली यांचे गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 89 होते. सांगोला नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ. छाया हेमंत तेली, धोंडीराम तेली व रमेश तेली यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांचा तिसरा दिवस विधी आज शनिवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सांगोला येथील कैलासभूमी स्मशानभूमीत होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.