म. बसवेश्वर युवक संघटनेच्या अध्यक्ष पदी ओंकार उकळे यांची निवड

सांगोला/प्रतिनिधी:: महात्मा बसवेश्वर युवक संघटनेच्या अध्यक्षपदी ओंकार उकळे तर सचिव पदी शंभूराजे झपके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. म. वी.सभेचे माजी प्रांताध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके व तालुका अध्यक्ष अमर लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली म.बसवेश्वर संघटनेची बैठक नुकतीच पार पडली त्यामध्ये सण २०२३-२४ वर्षाकरिता नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.

बैठकीच्या सुरवातीला संघटनेचे मावळते अध्यक्ष संदीप पाटणे यांनी गत वर्षामध्ये झालेल्या कार्यक्रमाचा आढावा व जमाखर्च वाचून दाखविला.त्यास सर्वांनुमाते मंजुरी देवून २०२२ – २३ मध्ये संघटनेच्या वतीने राबविण्यात आलेल्या कार्याचे कौतुक करण्यात आले.त्यानंतर चालू वर्षांकरिता नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.यावेळी नूतन अध्यक्ष म्हणून ओंकार उकळे,कार्याध्यक्ष सुमित चांदणे, उपाध्यक्ष औदुंबर लोखंडे, सचिव शंभूराजे झपके, खजिनदार संतोष गूळमिरे तर कार्यकारणी सदस्य म्हणून सुनील शेटे,संतोष महिमकर, प्रसाद जिरगे शुभम ढोले,अक्षय होनराव संदेश पलसे, मंगेश घोंगडे, हरिभाऊ कोरे,अजिंक्य घोंगडे,धीरज लोखंडे, चेतन कोवाळे,निलेश नष्टे, नागेश तेली, नितीन बुंजकर व अविराज स्वामी यांची निवड करण्यात आली.
यावेळी झालेल्या बैठकीत चालू वर्षी महात्मा बसवेश्वरांची नवीन उत्सव मूर्ती आणण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर बैठकीस संघटनेचे मार्गदर्शक आनंदराव घोंगडे, मनोज उकळे, सुहास होनराव, मकरंद अंकलगी, राजकुमार गुळमीरे, माऊली तेली, सुहास घोंगडे,नरेंद्र होनराव,राजू मू.घोंगडे,नानू देशमुख, सीताराम महिमकर यांचेसह वीरशैव लिंगायत समाज व युवक संघटनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.