डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे जनावरांचा बाजार होणार सुरु


गेले अनेक दिवस झाले लंपी आजाराच्या प्रादुर्भावाने सांगोला येथे रवीवारी भरणारा जनावरांचा आठवडा बाजार प्रशासनाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.
सांगोला तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी यांनी लंपी जनावरांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन पशुपालकांना काळजी घेण्याचे अवाहन वारंवार केले होते…तसेच प्रत्येक गावागावात वाड्या वस्त्यावरती जाऊन लशीकरण सुध्दा केले..लशीकरणामुळे व पशुपालकांच्या दक्षतेमुळे लंपी आजाराचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी थांबला गेला.परंतु जनावरांचा बाजार बंद आसलेमुळे अनेकांना अर्थीक अडचणीला सामोरे जावे लागत आहे..मुळात शेतकरी निसर्गाच्या लहरीपणा मुळे व सरकारी साह्य न मिळाल्याने पुरता हैराण झालेला असताना.शेतकऱ्यांना जनावरांच्या माध्यमातून चार पैसे मिळत आहेत…काही लोक जनावरांची बाजारात जाऊन खरेदी करतात काही लोक विक्री करतात काही पहीली जनावरे विकुन नवीन घेणारा..या वरती कुटुंबाचा उदरनिर्वाह सध्या बऱ्यापैकी चालू आहे..
आशा अवस्थेत गेले अनेक दिवस जनावरांचा बाजारही बंद आहे.. वेगवेगळ्या भागातील व तालुक्यातील शेतकरी व अनेक व्यापारी यांनी डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांची प्रत्यक्ष भेटून बाजार सुरु करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत असे सांगीतले होते… डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी सोलापुरचे मा.जिल्हाधिकारी साहेब व मा जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांना बाजार सुरु करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला होता..
सोमवार दिनांक २७/२/२०२३ रोजी मार्केट कमेटीचे मा.चेअरमन गिरीष गंगथडे यांनी आपल्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन सोलापूरला जाऊन प्रत्यक्ष जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना भेटुन डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांचा फोनवरती संवाद साधुन दिला व डॉ बाबासाहेब देशमुख यांनी लंपीचा प्रादुर्भाव कमी झालेला असुन आंम्ही योग्य ती काळजी घेऊनच बाजार सुरु करणेबाबत आपणास पुर्वच मागणी केली आहे तरी आपण बाजार सुरु करण्यास परवानगी द्यावी .. संबंधित अधिकाऱ्यांनी ही या मागणीचा गांभीर्याने विचार करुन मा.चेअरमन गिरीष गंगथडे यांच्या कडे बाजार सुरु करण्यास परवानगीचे पत्र दिले..आशा रीतीने डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या रास्त मागणीमुळे व पाठपुराव्यामुळे सांगोल्याचा जनावरांचा आठवडा बाजार सुरु करण्यास परवानगी मिळाली असलेलची माहीती प्रसिद्ध प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली