सांगोला तालुकाराजकीय

नीरा देवधरचे हक्काचे पाणी सांगोल्यासह पंढरपूर तालुक्याला मिळणार – चेतनसिंह केदार-सावंत

सांगोला ( प्रतिनिधी): पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी फायदेशीर ठरणाऱ्या नीरा देवघर धरणाच्या  कालव्यासह तीन उपसा सिंचन योजनांच्या कामांसाठी सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या तिसऱ्या सुधारित प्रशासकीय प्रस्तावाला मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. दरम्यान या योजनेत सांगोला आणि पंढरपूर तालुक्याचा समावेश करण्यासाठी राष्ट्रवादीसह आ. रामराजे निंबाळकर यांनी विरोध केला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खा.रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून सांगोला आणि पंढरपूर तालुक्याचा नीरा देवघर सिंचन योजनेत समावेश झाला असून या दोन्ही तालुक्याला हक्काचे पाणी मिळणार असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी सांगितले.

नीरा देवधर ही सिंचन योजना पूर्णत्वास आणण्यासाठी तसेच या योजनेत सांगोला आणि पंढरपूर तालुक्याचा समावेश करण्यासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. नीरा देवघरचे सांगोला, पंढरपूर, माळशिरस तालुक्यांचे हक्काचे पाणी बारामतीकरानी पळवल्यानंतर खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी खा. शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. नीरा देवघर योजनेत सांगोला आणि पंढरपूर तालुक्याचा समावेश करून हक्काचे पाणी देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून सांगोला आणि पंढरपूर तालुक्याचा नीरा देवघर सिंचन योजनेत समावेश झाला आहे. नीरा देवघर धरणाच्या  कालव्यासह तीन उपसा सिंचन योजनांच्या कामांसाठी सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या तिसऱ्या सुधारित प्रशासकीय प्रस्तावाला मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे.
नीरा देवघर सिंचन योजनेत सांगोला आणि पंढरपूर तालुक्याचा समावेश करण्यासाठी आमदार रामराजे निंबाळकर यांच्यासह बारामतीकरांनी विरोध केल्याने खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी आक्रमक भूमिका घेत पाण्यासाठी लढा उभा केला. त्यांना आमदार शहाजीबापू पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी मोलाची साथ दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नीरा देवघर सिंचन योजनेत सांगोला आणि पंढरपूर तालुक्याचा समावेश करण्यात आला असल्याने या दोन्ही तालुक्याचा पाणी प्रश्न सुटला आहे. निरेचे पाणी पळवून नेण्याचा बारामतीकरांचा निर्णय हाणून पाडत खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगोला आणि पंढरपूर तालुक्याला नीरा देवघरचे हक्काचे पाणी देण्यासाठी लढा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खा.रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून सांगोला आणि पंढरपूर तालुक्याचा नीरा देवघर सिंचन योजनेत समावेश झाल्याने या दोन्ही तालुक्याला हक्काचे पाणी मिळणार असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!