सोनंदचे माजी सरपंच डॉ.लालासो बाबर यांचे निधन

सोनंद(वार्ताहर):- सोनंद ग्रामपंचायतचे माजी सरपंच व ज्येष्ठ समाजसेवक स्वांतत्र्य सेनानी डॉ.लालासो माधवराव बाबर यांचे सोमवार दि. 27 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 94 होते. युवा नेते जगदीश बाबर व महेश बाबर यांचे ते वडील होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 1 मुलगी , सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा रक्षा विसर्जन दिवस आज बुधवार दि.1 मार्च रोजी सकाळी 7.30 वाजता सोनंद ता.सांगोला जि.सोलापूर येथे होणार असल्याचे त्यांचे नातेवाईकांनी सांगितले.
डॉ.लालासाो बाबर यांचे सोनंद गावाच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान आहे. शेती, पाणी व शिक्षण या विषयात मोठे कार्य केले आहे. एक शिक्षक, मुख्याध्यापक, सरपंच, सोसायटी चेअरमन, जिल्हा बँकींग सह अनेक संस्था उभा करण्यात त्यांचा मोठे योगदान होते. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1930 रोजी मध्य प्रदेश मधील ग्वाल्हेर शहरात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण तेथेच झाले. जीवनभर त्यांनी गांधीवादी जीवन जगले. अतिशय प्रामाणिक, निर्व्यसनी अणि सकारात्मक विचार सरणी मुळे ते नेहमी समाधानी असायचे.त्यांचा स्वभाव मनमिळावू होता. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.