सांगोला येथे स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी साजरी

सांगोला(प्रतिनिधी)-अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा सांगोला व सावरकर विचार मंच सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने विठ्ठल मंदिर, देशपांडे गल्ली येथे स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
प्रारंभी उपस्थित महिलांचे हस्ते सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तदनंतर श्री लक्ष्मीकांत लिगाडे व अॅड. महेश पत्की यानी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेली देशभक्तीपर गाणी गाऊन स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या भावना जागृत केल्या.
यानंतर ग्राहक पंचायतीचे कोषाध्यक्ष प्रा.कुलकर्णी सर म्हणाले की, सावरकरानी पारतंत्र्यात लढा देताना काय कार्य केले. या महापूरूषांच्या जिवनाचे अवलोकन करताना अंगावर शहारे येतात. सावरकरांनी समाजात राष्ट्रभक्ती जागृत केली.समाजात असणारे न्यूनगंड दूर केले. आपल्या सर्वाना पारतंत्र्याचा अनूभव नाही. स्वातंत्र्य पूर्व काळात जगणारांची दूखे काय होती. त्यांच्या वेदना काय होत्या अशा कार्यक्रमातून आपल्याला कळतात. आपल्याला गुलामगिरीचे जिवन नको असेल तर देशभक्तांच्या कार्यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. सावरकरांनी मराठी मध्ये प्रतिशब्द आणले. त्यांनी अभिनव भारत ही सर्व समावेशक संस्था काढली. त्यांच व्यक्तिमत्व बहूआयामी होते.असे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे मा.श्री. लऊळकर सर यानी माझी जन्मठेप या सावरकरांच्या आत्मचरित्रातील संदर्भ देऊन अंदमान निकोबारच्या तुरुंगात भिंतीवर केलेली काव्यरचना; मातृभूमी विषयी असणारे त्यांचे प्रेम हे अनुभव सांगत असताना श्रोते भारावून गेले.
यानंतर जेष्ठ पत्रकार श्री नागेश जोशी म्हणाले, ज्या थोर देशभक्तांनी क्रातीकारकानी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजाच्या जूलमी राजवटी विरुद्ध लढा दिला. त्यांची जाणीव ठेवणे. त्यांच्या विचारांचे संस्कार तरूण पीढीवर होणे काळाची गरज आहे. असे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर याना ’भारतरत्न ’पुरस्कार मिळाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
शेवटी समारोपाच्या वेळी बोलताना अॅड.विशाल बेले म्हणाले की स्वताच असो, कुटुंबांचे असो वा देशाचे संरक्षण असो सर्व प्रथम प्रत्येकानी आपल्या स्वाथ्याकडे लक्ष दिले पाहिजे. तब्येत सांभाळून रहाणे हा संदेश दिला.
स्वागत व आभार डॉ. मानस कमलापूरकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेजस कुलकर्णी, रवि कुलकर्णी, क्षितीज लिगाडे, उदय पूजारी यांनी विशेष परिश्रम घेतले.