सांगोला येथील संदीप होनमाने यांची पशुसंवर्धन विभागात लघुलेखक पदी निवड

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला शहरातील सनगर गल्ली येथील संदीप बाळासाहेब होनमानेे यांनी 200 पैकी 164 गुण मिळवत महाराष्ट्रात चौथा क्रमांक एनटीसी प्रवर्गामधून पहिला क्रमांक मिळवून महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग लघुलेखक पदी निवड झाली. परिस्थितीशी दोन हात करून जिद्द चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर यश संपादन केले त्याबद्दल संदीप यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
सांगोला शहरातील सनगर गल्ली येथील संदीप बाळासाहेब होनमाने यांचे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण हे सांगोल्यात झाले. त्यानंतर पुढील शिक्षण हे कोल्हापूर येथे त्यांनी घेतले. दरम्यान परिस्थितीशी दोन हात करून शिक्षणाच्या माध्यमातून यश संपादन करण्याचे ध्येय समोर ठेवून त्यांनी 11 सप्टेंबर रोजी स्टेनो परीक्षा दिली. या 13 जागेच्या परीक्षेसाठी सुमारे 3000 विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म भरले होते.
सदर परीक्षेचा निकाल गुरुवारी 23 रोजी झाला. या निकालामध्ये महाराष्ट्रातून 4 था क्रमांक तर एनटीसी प्रवर्गांमधून 1 ला. क्रमांक त्यांनी मिळवला आहे. यामुळे सांगोला तालुक्याचे नाव सबंध राज्यात लौकिक झाले आहे. त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.