सांगोला तालुकाराजकीय

माढा मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न सोडवून मतदारांना दिलेला शब्द पाळला – खा. रणजितसिंह निंबाळकर

नीरा देवधरच्या प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे. या योजनेसाठी ३१०० कोटी रुपयांची आवश्यकता असून केंद्र सरकारकडे अडीच हजार कोटी रुपयांची मागणी करणार आहोत. कायम दुष्काळी असणाऱ्या फलटण, सांगोला, माण, खटाव, माढा, करमाळा, माळशिरस तालुक्यातील 50 हजार हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारसघांतील पाण्याचा प्रश्न शिल्लक ठेवणार नसल्याचा मतदारांना शब्द दिला होता. अपेक्षेप्रमाणे मी मतदारांना दिलेला शब्द पाळला असून येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पाण्याचा प्रश्न राहणार नसल्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितले.

कायमच दुष्काळी असणाऱ्या फलटण, सांगोला, माण, खटाव, माढा, करमाळा, माळशिरस तालुक्यातील तालुक्यातील 50 हजार हेक्टर क्षेत्राला फायदा होणाऱ्या नीरा देवघर योजनेला महाराष्ट्राच्या बजेटमध्ये 100 कोटी रुपये मंजूर झाल्याने भाजप खासदार रणजित निंबाळकर यांनी मास्टरस्ट्रोक लगावला आहे. नीरा देवधर प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपयांचे टेंडर काढण्याची सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. यातील ३०० कोटी रुपयांचे टेंडर आठ दिवसात निघतील. नीरा देवधर प्रकल्पासाठी ३१०० कोटी रुपयांचा निधीची आवश्यकता आहे. मी केंद्राच्या जलशक्ती बोर्डाचा सदस्य असून या योजनेसाठी केंद्र सरकारकडे अडीच हजार कोटी रुपयांची मागणी करणार आहे. माढा तालुक्यातील कुकडी प्रकल्पाच्या पाण्याचे फेरवाटप होणार असून यात मांगी तलावाचा समावेश करण्याची मागणी केली आहे. रीटेवाडी उपसा सिंचन प्रकल्पातून करमाळा तालुक्याला पाणी देण्याची योजना आखली आहे.
नीरा देवघर डावा कालवा 66 किलोमीटर ते 158 किलोमीटर आणि उजवा कालवा 11 किलोमीटर ते 65 किलोमीटर मध्ये अस्तरीकरण तसेच गावडेवाडी, शेख मिरवाडी आणि वाघोशी येथे उपसा सिंचन योजनेचा समावेश या कामात करण्यात आला आहे. यासाठी चालू वर्षी 100 कोटी रुपये निधी मंजूर झाला असून 319 कोटीच्या सूचीस शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये नीरा उजवा 77 ते 131 किलोमीटर मधील बंदिस्त मालिकेद्वारे मुख्य कालवा आणि त्यावरील वितरण व्यवस्थेचे काम करण्याचा समावेश आहे . नीरा देवघर प्रकल्पांतर्गत फलटण तालुक्यातील उजवा कालवा 77 ते 131 किलोमीटर इतकी लांबी येते. हा भाग कायम दुष्काळी असल्याने फलटण तालुक्यातील किमान 10 किलोमीटर लांबीचे काम हाती घेण्याचा आग्रह खा.निंबाळकर यांनी लावून धरला होता. यासाठी केंद्रीय निधी मिळण्यासाठी प्रस्ताव तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविला होता. सध्या या कामाच्या निविदाचे काम सुरु झाल्याने कायम दुष्काळी असणाऱ्या माढा मतदारसंघातील जवळपास 50 हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळण्याच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात उजवा कालवा 77 ते 87 किलोमीटर या कामाच्या निविदा प्रक्रियेची कामे अंतिम टप्प्यात आलेली आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारसघांतील पाण्याचा प्रश्न शिल्लक ठेवणार नसल्याचा मतदारांना शब्द दिला होता. त्यानुसार मतदारसंघातील जीहे कठापूर, उरमोडी, नीरा देवधर, खैराव, मानेगाव, परितेवाडी, दहिगांव, रीटेवाडी या सिंचन प्रकल्पातून पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. मी मतदारांना दिलेला शब्द पाळला असून मतदारसंघातील सर्वच तालुक्यांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी टोकाचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पाण्याचा प्रश्न राहणार नसल्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!