सांगोला तालुका

शालेय क्रीडा स्पर्धेत उत्कर्ष विद्यालयाची दमदार कामगिरी…

शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत उत्कर्ष विद्यालयाने विविध क्रीडा प्रकारात यश संपादन करत तालुक्यात अव्वल स्थान पटकावले.
स्पर्धेच्या प्रथम दिनी 17 वर्षे वयोगटामध्ये कु स्वरश्री सचिन देशपांडे इयत्ता नववी या विद्यार्थिनीने सांगोला तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून स्पर्धेची दमदार सुरुवात केली.
ओंकार योगेश लांडगे याने 14 वर्षे वयोगट १०० मीटर धावणे मध्ये तृतीय क्रमांक तसेच लांब उडी या प्रकारात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय फेरी गाठून जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला. ओंकार लांडगे या विद्यार्थ्याची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
गोळा फेक स्पर्धेमध्ये आरीश आगा याने तालुक्यात द्वितीय तर नईम मुलाणी याने तृतीय क्रमांक पटकावला. ८० मीटर अडथळा स्पर्धा ओंकार लांडगे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक तर प्रणव केदार याने द्वितीय क्रमांक पटकावला. प्रथमेश साळुंखे याने 110 मीटर अडथळा स्पर्धेत तालुक्यात द्वितीय क्रमांक, अमेय सुहासचंद्र पवार याने 14 वर्षीय उंच उडी स्पर्धेत तालुक्यात द्वितीय क्रमांक, कुस्ती 57 किलो 14 वर्षे वयोगट पृथ्वीराज साळुंखे याने सांगोला तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत मैदानी स्पर्धेत सांगोला तालुक्यात उत्कर्ष विद्यालयाचा दबदबा निर्माण केला.
या मैदानी स्पर्धेत उत्कर्ष विद्यार्थिनींनीही दमदार कामगिरी केली. वैष्णवी जांगळे हिने 14 वर्षे वयोगट 100 मीटर अडथळा शर्यत तालुक्यात द्वितीय क्रमांक, पूजा गावडे 14 वर्षे वयोगट ८० मीटर अडथळा तालुक्यात प्रथम क्रमांक, ज्ञानेश्वरी बाबर 14 वर्षे वयोगट 80 मीटर अडथळा तालुक्यात तृतीय क्रमांक, वैष्णवी पवार 17 वर्षीय वयोगट 400 मीटर अडथळा तालुक्यात द्वितीय क्रमांक, अमृता पवार 17 वर्षीय वयोगट 400 मीटर अडथळा तालुक्यात तृतीय क्रमांक, प्रणाली केदार 17 वर्षीय वयोगट 100 मीटर अडथळा तालुक्यात द्वितीय क्रमांक, वैष्णवी भाकरे थाळीफेक 14 वर्षीय वयोगट तालुक्यात द्वितीय क्रमांक तसेच रेवा विजयकुमार चडचणकर हिने कुस्ती प्रकारात 58 किलो वजनी गटात तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावत विद्यालयाचा गौरव वाढविला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक श्री. सचिन गोतसूर्य आणि कुंभार सर यांचे संस्था अध्यक्षा मा. डॉ संजीवनीताई केळकर, कोषाध्यक्षा डॉ शालिनीताई कुलकर्णी, शाळा विभाग प्रमुख प्रा.नीलिमाताई खर्डीकर, सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री सुनील कुलकर्णी सर , पर्यवेक्षक मिसाळ सर व भोसले सर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालकांनी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!