सांगोला तालुका

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान आणि डॉ.केळकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ‘स्तनाचा कॅन्सर टाळावा यासाठी तपासणी व मार्गदर्शन’ शिबिर संपन्न

सांगोला(प्रतिनिधी):- शनिवार दि. 11 मार्च रोजी केळकर हॉस्पिटल मध्ये माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान आणि डॉ.केळकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ‘स्तनाचा कॅन्सर टाळावा यासाठी तपासणी व मार्गदर्शन’ शिबिर घेण्यात आले. शिबीर घेण्यासाठी कोल्हापूर येथील मोरया हॉस्पिटलमधील प्रसिध्द सर्जन डॉ. संगीता काटे- निंबाळकर यांनी सहकार्य केले.
शिबिराची सुरुवात डॉ.रणजीत केळकर यांनी पाहुण्यांना फुलझाड देऊन व दीपप्रज्वलन करून झाली. शिबिरात एकूण 85 महिलांची तपासणी केली. व डॉ. संगीता काटे- निंबाळकर यांनी आपल्या मार्गदर्शनात कॅन्सर बाबत महिलांमध्ये असलेली भीती, स्वतः स्वतःची कशी तपासणी करावी, कॅन्सर वरील आधुनिक उपचार व शस्त्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. तसेच महिलांच्या शंकांचे निरसनही केले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ.संजीवनी केळकर, उपाध्यक्षा माधवी देशपांडे, खजिनदार डॉ. शालिनी कुलकर्णी, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. केतकी  देशपांडे व डॉ. सुपर्णा केळकर उपस्थित होते. शिबीर संपन्न करण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते व केळकर हॉस्पिटल मधील कर्मचारी याचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!