फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये मेसा अंतर्गत वृक्षारोपण संपन्न

सांगोला: फॅबटेक एज्युकेशन सोसायटी संचलित,फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
अँड रिसर्च मधील मेकॅनिकल विभागाची विद्यार्थी संघटना ( मेसा )
अंतर्गत ९ मार्च २०२३ रोजी कॅम्पसमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित
करण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित
रुपनर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणाचा उद्देश
पर्यावरण वाचवणे आणि आपल्या परिसराचे सुशोभीकरण करणे हा होता.या वेळी
मेकॅनिकल विभागाच्या (मेसा) अंतर्गत या कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले
होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन मा. श्री.भाऊसाहेब रुपनर,
कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे,
यांच्यासह अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ रवींद्र शेंडगे व डिप्लोमाचे
प्राचार्य प्रा. शरद पवार, प्रा.टी एन जगताप, डॉ.तानाजी धायगुडे व
मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभाग प्रमुख प्रा. राहुल अवताडे व मेसा समन्वयक
प्रा. प्रियांका पावसकर ,तसेच सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व
शिक्षकेत्तर कर्मचारी, मेसा अध्यक्ष धीरज आलदर, मेसा सचिव शुभम पाटील व
विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते