कोविड काळात आरोग्य कर्मचार्यांनी केलेलं काम तालुक्यातील जनता विसरणार नाहीं -दिपक आबा साळुंखे पाटील; अस्तित्व संस्थेच्या वतीने तालुक्यातील आरोग्य सेवांवर चर्चासत्र संपन्न.

कोविड 19 च्या काळात तालुक्यातील सरकारी आरोग्य कर्मचार्यांनी रात्रंदिवस मेहनत घेउन तालुक्यातील सामान्य रुग्णांना दिलेली सेवा तालुक्यातील जनता विसरणार नाहीं असे मत माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केले. अस्तित्व संस्थेच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राबवल्या जात आसलेल्या कम्युनिटी अक्षण फॉर हेल्थ प्रकल्पांतर्गत सार्वजनिक आरोग्य सेवांवर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिपक आबा साळुंखे पाटील बोलतं होते ते पूढे बोलतांना म्हणाले की, आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांना अतिशय तुटपुंज्या सेवा सुविधा आहेत, मनुष्यबळ कमी आहे, संसाधने कमी आहेत असे असताना सुधा आरोग्य कर्मचारी काम करीत आहेत हे कौतुकास्पद असुन आरोग्य कर्मचार्यांच्या अडी अडचणी यापुढच्या काळात निश्चित पणे सोडवण्यासाठी आम्ही नेतेमंडळी पुढाकार घेऊ, अस्तित्व संस्था तालुक्यात करीत असलेले काम हे कौतुकास्पद असून समाजातल्या शेवटच्या घटकांना दर्जेदार आरोग्य सेवा कशी मिळेल यासाठी संस्था सातत्याने काम करते आहे याचा आम्हाला अभिमान आहे. यावेळी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख हेही उपस्थित राहुन कर्मचार्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय अधिकारी कर्मचारी यांच्याकडुन आढावा घेतला.
अस्तित्व संस्थेने केलेल्या अभ्यासाची मांडणी आपल्या प्रास्ताविकातून अस्तित्व चे अध्यक्ष शहाजी गडहिरे यानी मांडली त्यामधे प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन केले. औषधांचा साठा, कर्मचारी अधिकारी यांच्या निवास व्यवस्थेचा अभाव, पिण्याचे पुरेसे आणि स्वच्छ पाण्याची कमतरता, शौचालये नाहीत यावर शहाजी गडहिरे यांनी मांडणी केली. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक गटविकास अधिकारी काळूखे साहेब, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी उपस्थित होते. चर्चा सत्रास तालुक्यातील विविध गावचे सरपंच उपसरपंच आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या. चर्चा सत्रात अनेक आशा वर्कर्स, आरोग्य सहायक यांनी काम करीत असताना येणार्या अडचणी मांडल्या. सुरुवातीला स्वागत विशाल काटे यांनी केले तर आभार दिपाली भुसनर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय धनवडे, सागर लवटे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास मोठ्या संख्यने लोकं उपस्थित होते.
सार्वजनिक आरोग्सेवा सुधारण्यासाठी शासनाने लक्ष देण्याची गरज – डॉ. बाबासाहेब देशमुख
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधे नाहीत, अनेक दिवसांपासून आशा कार्यकर्तीकडे किट नाहीत, पुरेसे मनुष्यबळ नाहीं यामुळं सर्वसामान्य नागरिकांना पुरेशी सेवा मिळत नाहीं शासनाने आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देण्याची गरज आहे. खाजगी दवाखान्याचा खर्च न परवडणार्या नागरिकांची सध्या वाईट स्थिती आहे.
—————————————————
दर्जेदार सार्वजनिक आरोग्य सेवेचे सांगोला हे मॉडेल बनावे-शहाजी गडहिरे
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरु असलेल्या आरोग्यासाठी सामाजीक कृती प्रकल्पाच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सेवेसाठी प्रयत्न असुन सांगोला तालुका चांगल्या आरोग्य सेवेसाठी एक मॉडेल म्हणून कसा पूढे येईल यासाठी सर्वाणी प्रयत्न करूयात.