राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळा व स्मारकासाठी जागा मिळण्यासाठी आंदोलन

सांगोला (प्रतिनिधी): शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहासमोर व्यापारी संकुलाचे बांधकाम करु नये. त्याठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहाच्या प्रांगणामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा, चबुतरा व स्मारकासाठी जागा व निधी मंजुर करावा या मागणीसाठी सोमवारी अहिल्याप्रेमीच्या वतीने सांगोला तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन करण्यात आले.
सांगोला नगरपालिकेला ५ कोटी ८० लाख रुपयांचा निधी २२ सप्टेंबर २०२२ रोजी सांगोला मंजूर झाला आहे. त्या निधीतून राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहासमोरील बाजूस व्यापारी संकुल बांधण्यासाठी २ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या निधीतून व्यापारी संकुल बांधल्यानंतर पुण्यश्लोक राजामाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा झाकला जाणार आहे. असे झाल्यास सांगोलावासीय इतिहास पुसण्याचे साक्षीदार होणार आहेत. त्यामुळे शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहासमोर व्यापारी संकुलाचे बांधकाम करु नये. त्याठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहाच्या प्रांगणामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा, चबुतरा व स्मारकासाठी जागा व निधी मंजुर करावा या मागणीसाठी सोमवारी अहिल्याप्रेमीच्या वतीने सांगोला तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणीक आंदोलन करण्यात आले. यावेळी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, आंदोलनकर्ते तुषार इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी डॉ. बाबासाहेब देशमुख, रासपचे प्रदेश सरचिटणीस सोमा आबा मोटे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, प्रताप मस्के, प्रमोद ठोंबरे, नवनाथ शिंगाडे, राहुल मस्के, दत्तात्रय जानकर, किरण पांढरे, शेखर गडहिरे, लक्ष्मण मारकर, बाबुराव मेटकरी, नंदकुमार मेटकरी, विष्णू देशमुख, सतीश मोटे, रघुनाथ ऐवळे यांच्यासह धनगर समाज बांधव उपस्थित होते.