फॅबटेक पॉलिटेक्निक मध्ये वार्षिक क्रिडा स्पर्धा संपन्न

सांगोला : सांगोला शहरातील फॅबटेक पॉलिटेक्निक मध्ये वार्षिक क्रिडा
स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन फॅबटेक टेक्निकल
कॅम्पस चे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ अमित रुपनर यांच्या हस्ते झाले.यावेळी
कॅम्पस डायरेक्टर श्री संजय आदाटे व पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा शरद
पवार उपस्थित होते.
सदर मुलांच्या स्पर्धेतील क्रिकेट सामन्यामध्ये सिव्हिल विभागाने
विजेतेपद व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाने उपविजेतेपद
पटकावले.खो खो क्रीडा प्रकारामध्ये मेकॅनिकल विभागाने बाजी मारताना
विजेते व उपविजेते पदावर मोहोर उमटवली. कबड्डी क्रीडा प्रकारामध्ये
सिव्हिल विभागाने विजेतेपद तर मेकॅनिकल विभागाने उपविजेतेपद
पटकावले.व्हॉलीबॉल प्रकारात मेकॅनिकल विभागाने विजेते पद व
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाने उपविजेते पद
पटकावले.बॅडमिंटन या वैयक्तिक क्रीडा प्रकारात मेकॅनिकल विभागामधिल
विद्यार्थ्यानी बाजी मरताना पृथ्वीराज चव्हाण यानी विजेते पद पटकावले तर
श्रेयश ढोले याने उपविजेतेपद पटकावले.
मुलींच्या स्पर्धेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाने
निर्भेळ यश संपादन करताना खोखो आणि कबड्डी या दोन्ही सांघिक क्रीडा
प्रकारात विजेतेपद व उपविजेतेपद पटकावले.बॅडमिंटन या वैयक्तिक क्रीडा
प्रकारात सिव्हिल विभागातील रितू खांडेकर ने विजेतेपद तर इलेक्ट्रॉनक्स
अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील उमा बाबर हिने उपविजेतेपद पटकावले.
या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी क्रीडा समन्वयक प्रा बापूसाहेब गुंजाळ ,
प्रा. श्रीकांत बुरुंगले, प्रा भानुदास गडदे, प्रा मारुती भोसले ,प्रा
प्रफुल्ल कांबळेयांनी मोलाचे सहकार्य केले .
या स्पर्धेतील सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन श्री
भाऊसाहेब रुपनर व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री दिनेश रुपनर यांनी
अभिनंदन केले.