जवळा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी डॉ. श्री. संजीव कुलकर्णी तर व्हाईस चेअरमनपदी श्री. बबन सुरवसे यांची बिनविरोध निवड.

जवळा ( प्रशांत चव्हाण) जवळा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या सन 2023 ते 2028 या पाच वर्षाच्या कालावधी करिता चेअरमनपदी डॉ. श्री. संजीव कुलकर्णी तर व्हाईस चेअरमनपदी श्री बबन सुरवसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री विलास घोडके यांनी प्रशासकीय कामकाज पाहिले. या निवडीनंतर संस्थेच्या वतीने नूतन चेअरमन, नूतन व्हाईस चेअरमन निवडणूक निर्णय अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नूतन चेअरमन डॉ. श्री. संजीव कुलकर्णी सत्काराला उत्तर देताना म्हणाले संस्थेची आर्थिक स्थिती नाजूक असताना लेखापरीक्षक श्री. श्रीरंग जोशी, लेखापरीक्षक श्री नानासो साळुंखे, श्री. हेमंत कुलकर्णी तसेच बाळासाहेब वाघमारे यांचे अतिशय बहुमोल असे सहकार्य लाभले. कोरोना काळात ठप्प झालेली थकबाकी वसुली करणे ठेवीदारांच्या ठेवी देणे तसेच नवीन कर्ज प्रकरणे ही संस्थेची प्रमुख उद्दिष्टे असल्याचे त्यांनी सांगितले याप्रसंगी नूतन संचालक श्री. संजय कोळेकर, श्री. अनिल पंडित, श्री. पोपट नाडगे, श्री. सुधीर (बापू) लिगाडे, श्री. विजयकुमार चिंचणे, श्री. प्रदीप गोरे, सौ. उषा सुरवसे, यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.