फॅबटेक कोचिंग अकॅडमीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगोला : फॅबटेक एज्युकेशन सोसायटी संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये नीट, सीईटी २०२३ क्रॅश कोर्सचे उद्घाटन दिनांक ०९ मार्च २०२३ रोजी झाले. संस्थेचे चेअरमन श्री . भाऊसाहेब रुपनर,संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री .अमित रूपनर, कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर , कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, फॅबटेक पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांच्या उपस्थितीत या कोचिंग अकॅडमीचे उद्घाटन करण्यात आले.

सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन शिक्षण घेणे शक्य नसते , बाहेरील शिक्षण हे आपल्या इथेही मिळावे व विद्यार्थ्यांची प्रगती अतिशय सुंदर पद्धतीने व्हावी हाच मुख्य हेतू होय…. ! बारावी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना वैद्यकीय , इंजीनियरिंग , औषधनिर्माणशास्त्र, अभ्यासक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. नीट परीक्षेची काठीण्यपातळी दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक प्रयत्न करावे लागतात. परीक्षांची पूर्णपणे तयारी करण्यासाठी आपल्यासमोर फॅबटेक कोचिंग अकॅडमी अगदी सज्ज आहे. या अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे परिपूर्ण ज्ञान मिळावे , यासाठी अनुभवी प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. अकॅडमीमध्ये विषयानुसार अनुभवी प्राध्यापक आहेत जसे की, श्री.अजय सर यांचा ९ वर्षे अनुभव असून ते केमिस्ट्री हा विषय शिकवतात. तसेच श्री.
मुळे सर यांना केमिस्ट्री भाग दोन विषयाचा ११ वर्षाचा अनुभव आहे. फिजिक्स श्री. खोत सर १८ वर्षे अनुभव, बायलॉजी श्री. फुटाणे सर ९ वर्षे , श्री .गंभीर सर २३ वर्षे , गणित विषय श्री. यादव सर २५ वर्षे व श्री खान सर १२ वर्षे असा प्रगल्भ अनुभव असणारे नामांकित व अनुभवी प्राध्यापक वर्ग आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीचे पुरेपूर ज्ञान मिळावे हाच दृष्टिकोन लक्षात ठेवून विद्यार्थ्यांचे दिवसाचे वेळापत्रकही बनवण्यात आले आहे.एखादा घटक शिकवल्यानंतर त्या घटकावरती चाचणी परीक्षा ही घेऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येते व विद्यार्थ्यांना घटकाद्वारे शंका असतील तर त्या शंकांचे निरसन करण्यात येते.फॅबटेक कोचिंग अकॅडमी मध्ये आनंददायी शिक्षण देऊन विद्यार्थ्यांच्या मनावर तणाव निर्माण न करता शिक्षण दिले जाते. हा अनुभव अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे
त्यामुळे अनेक गावातूनही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत
आहे. या अकॅडमी मध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क– श्री. गोदे सर
7038929263