सांगोला तालुका

पुणे येथे आ रवींद्र धंगेकर यांचा डॉबाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सत्कार संपन्न….

पुणे कसबा विधानसभा मतदारसंघाचे अटीतटीच्या लढतीमध्ये मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आमदार रवींद्र धंगेकर यांचा शेकाप च्या वतीने शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते शाल श्रीफळ फेटा देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला याप्रसंगी स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांनी जनतेसाठी केलेले काम यांचा आदर्श ठेवून सर्वसामान्य जनतेसाठी गोरगरिबासाठी समाजकारण राजकारण करणार असल्याचे विचार आमदार रवींद्र दंगेकर यांनी व्यक्त केले.यावेळी सर्व नेतेमंडळी पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे येथे महानगरपालिकेच्या आवारात आमदार धंगेकर व डॉ बाबासाहेब देशमुख यांची सदिच्छा भेट झाली यावेळी पुणे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते मोहन जोशी,रामा फलटणे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष उद्योगपती इंजिनिअर अशोक आबा नरळे ~फलटणे, माजी नगराध्यक्ष मधुकर कांबळे, भाई रफिक तांबोळी,पुणे पणन अधिकारी कर्मचारी मंडळाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब देशमुख,अध्यक्ष सुभाष करांडे,पत्रकार जगदीश कुलकर्णी, यांच्यासह आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले महाराष्ट्रातील राजकारणातील भीष्म पितामह स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख यांचे फार मोठे कार्य होते राज्याच्या राजकारणातील मोठं नाव होते विधानसभेमध्ये केलेले आबासाहेब यांचे काम  विचार डोक्यात ठेवून समाजकारणात राजकारणात सक्रिय काम करत राहणार आहे डॉ बाबासाहेब देशमुख यांच्यावतीने झालेला विशेष सत्कार हा अविस्मरणीय आहे  दिलेल्या निमंत्रणावरून मी लवकरकरच सांगोला नगरीत सत्कारासाठी येणार आहे असे शेवटी आ धंगेकर यांनी सांगितले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख म्हणाले पुण्यासारख्या शहरांमध्ये कसबा विधानसभा निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून होते या मतदारसंघात आ रवींद्र धंगेकर यांनी चांगल्या मताधिक्याने विजय मिळवला याबद्दल त्यांचे अभिनंदन करून  शुभेच्छा देऊन सत्कार केला गेली अनेक दिवस अनेकांशी बोलताना एक जाणवत होतं, आ रविंद्र धंगेकर आमच्या जवळचे आहेत असं सांगणारी खूप लोक भेटली आणि ही लोक सामान्य होती जो सामान्य माणसालाही आपला वाटतोय,त्या आपल्या माणसाची भेट घेऊन आज त्या सर्वांच्या धंगेकर साहेबांबद्दलच्या भावनांची खरी जाणीव आणि तो आपलेपणाचा ओलावा नव्याने समजला असे डॉ  देशमुख यांनी सांगितले
यावेळी शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटनेचे कार्यकर्ते आमदार धंगेकर प्रेमी  पदाधिकारी नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्य स्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमी मध्ये व पुणे महानगरपालिकेच्या आवारामध्ये आ रवींद्र धंगेकर डॉ  बाबासाहेब देशमुख दोन जननायकांची भेट झाली हा एक सुवर्णयोग आहे असे रामा फलटणे चॅरिटेबल  ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष इंजिनिअर उद्योगपती अशोक (आबा) नरळे- फलटणे यांनी सांगितले.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!