टेंभू योजनेचे उन्हाळी आवर्तन लवकरच चालू होणार – आमदार शहाजीबापू पाटील
टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी कॅनल द्वारे येत्या दोन तीन दिवसात सोडण्यात येणार आहे या कॅनलच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज करून व पाण्याचे पैसे भरून सहकार्य करावे तसेच माणनदीमध्येही पाणी सोडण्याचे नियोजन केले जाणार आहे मागणी असलेल्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पाणी सोडून बंधारे भरून दिले जाणार आहेत असे प्रतिपादन आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले .
आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयात टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी सांगोला तालुक्यात लाभक्षेत्रातील कॅनॉल व माण नदीत सोडण्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी अधिकारी व लाभक्षेत्रातील शेतकरी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या वेळी आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड,तानाजी काका पाटील भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, आनंद घोंगडे अनिल खटकाळे योगेश खटकाळे पांडुरंग लिगाडे, विजय शिंदे यांच्यासह टेंभू सिंचन योजनेचे उपविभागीय अभियंता सुशीलकुमार गायकवाड माजी,उपविभागीय अभियंता एल .बी केगार,कालवा निरीक्षक दीपक मोरे आदीसह विविध गावचे सरपंच पाणी वापर संस्थेचे चेअरमन माण नदी काठावरील शेतकरी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.