में.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्स यांच्या वतीने “पारंपरिक दागिन्याचा महोत्सव
सांगोला शहरातील नामांकित सुवर्ण पेढी में.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्स यांच्या वतीने पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या दागिन्यांची परंपरा कायम राहावी यासाठी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर “पारंपरिक दागिन्याचा महोत्सव ” आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जयदीप रत्नपारखी यांनी दिली
सोमवार २० मार्च २०२३ रोजी सकाळी अकरा वाजता सांगोला शहरातील जिजामाता उद्यान समोर, जानकर हॉस्पिटल शेजारी,बस स्टॉंड पाठीमागे असलेल्या मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्सच्या शोरुम मध्ये ” पारंपरिक दागिन्यांच्या महोत्सवाचे” उद्घाटन राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ जयमाला महादेव गायकवाड यांच्या हस्ते,डॉ.जिवनमुक्ती शैलेश डोंबे,डॉ.मेघना संदीप देवकते,डॉ.अंजली अमर शेंडे,सौ.अर्चनाअनिल इंगवले,सौ.विद्या रमेश जाधव,सौ.राणीताई आनंदा माने, सौ.उमा प्रशांत उंटवाले,सौ.सुदर्शना आनंद लोकरे
यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
“पारंपरिक दागिन्यांचा महोत्सव” २० मार्च ते २७ मार्च २०२३पर्यंत चालणार आहे.अनेक नवनवीन व्हरायटीज व सुबक कलाकुसरीने घडवलेली दागिने प्रत्यक्षात पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी उपलब्ध असणार आहेत हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य असणार आहे.
नव्या अलंकाराने करुया नववर्षाचा शुभारंभ….!
स्वागत करुया नववर्षाचे..!
मराठमोळ्या अलंकाराने..!
तरी में.गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्सच्या शोरुम मध्ये आयोजित करण्यात आलेल्या “पारंपरिक दागिन्यांच्या महोत्सवास” उपस्थित राहावे असे आवाहन ज्वेलर्सच्या वीतीने जयदीप रत्नपारखी यांनी केले आहे.