सांगोला शहरातील श्रीमती कमल मार्डे यांचे निधन
सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला शहरातील श्रीमती कमल विजयकुमार मार्डे यांचे काल शनिवार 18 मार्च रोजी दुपारी निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 69 होते. सुनिल (बंडू) मार्डे यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्या पश्चात 1 मुलगा व 3 मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी उद्या सोमवार दि.20 मार्च रोजी सकाळी 7.30 वाजता सांगोला येथे होणार असल्याचे त्यांचे नातेवाईकांनी सांगितले. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.