जिल्हा परिषदेकडून सांगोला विधानसभा मतदारसंघातील दलित वस्ती विकास कामांसाठी ५कोटी ५८ लाख रुपये मंजूर -आमदार शहाजीबापू पाटील*
सांगोला तालुक्यातील ५५ पंढरपूर तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींना मिळाला निधी.
.
सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून सांगोला विधानसभा मतदारसंघातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे साठी आर्थिक वर्ष २०२२-२३अंतर्गत सांगोला तालुक्यातील दलित वस्ती विकास कामांसाठी ५कोटी २३लाख तर सांगोला विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गटातील दलित वस्ती विकास कामांसाठी 3५ लाख असा एकूण ५कोटी ५८लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली
सांगोला मतदारसंघातील वंचीत असणाऱ्या गावांचा समावेश करून सर्व ग्रामपंचायतींच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करण्यासाठी हा निधी मंजूर झाला आहे विकासापासून कोणताही घटक वंचित राहणार नाही सर्व गावांचा विकास करण्यासाठीच मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत आहे मी विकासाची गंगा सांगोला विधानसभा मतदार संघामध्ये आणत असताना कोणतेही गाव किंवा कोणती ग्रामपंचायत कोणत्या पक्षाची आहे कोणत्या विचाराची आहे असा कधीही भेदभाव केलेला नाही यापुढेही करणार नाही.
सांगोला विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेचा विकास करणे हेच माझे उद्दिष्ट आहे यामध्ये कधी कोणी राजकारण करू नये मंजूर झालेल्या निधीमधून मंजूर असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या मधील दलित वस्ती विकास कामे सुरळीत पूर्ण करून आवश्यक असलेल्या नागरी सुविधा नागरिकांना पुरविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. सांगोला विधानसभा मतदारसंघातील कोणते ही गाव विकासापासून वंचित राहणार नाही शिंदे – फडणवीस सरकारकडून यापुढील काळात भरभरून निधी विधानसभा मतदारसंघांमध्ये विकास कामांसाठी खेचून आणणार आहे सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत यावेळी बोलताना आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केले.