खूप मोठे व्हा, वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्या….डॉ. संजीवनी केळकर

उत्कर्ष विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये गुरूला वंदनीय स्थान द्यावे गुरुशिवाय ज्ञान नाही ,खूप मोठे व्हा वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करा व आपल्या गुरुचे शाळेचे नाव उज्वल करा .असे प्रतिपादन माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेच्या उत्कर्ष विद्यालयांमध्ये आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर संजीवनी ताई केळकर यांनी केले .
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष विद्यालयांमध्ये आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम गंधर्व कुलातर्फे आयोजित केलेला होता. त्यावेळेला व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा- संजीवनी ताई केळकर ,सचिव व शिक्षण विभाग प्रमुख -माननीय.सौ .नीलिमा कुलकर्णी मॅडम ,मुख्याध्यापक- कुलकर्णी सर ,पर्यवेक्षक- भोसले सर ,मिसाळ सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आले. त्यावेळेला गंधर्व कुलातील इयत्ता आठवीतील विद्यार्थी केदार जोशी यांने गुरुस्तवन म्हटले. इयत्ता पाचवी ते दहावीतील सर्व गुरुजनांचा सत्कार गंधर्व कुलातर्फे करण्यात आला.इयत्ता पाचवी मधील मनस्वी कुलकर्णी व आराध्या नवले यांनी नृत्यातून गुरूंना वंदन केले. गुरुपौर्णिमेची माहिती व गंधर्व कुलाद्वारे घेतले जाणारे उपक्रम व कार्यक्रमाचे नियोजन यांची माहिती शुभांगी कवठेकर यांनी प्रास्ताविकेतून दिले.
कुलाद्वारे घेण्यात आलेल्या अभंग गायन स्पर्धेतील प्रथम पाच क्रमांकातील विजेत्या विद्यार्थ्यांचे अभंग सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात आले. नंतर राजीव तांबे लिखित बोलकी दिवाळी या नाटकाचे नाट्यवाचन इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांनी केले.
या कार्यक्रमात शिक्षण विभाग प्रमुख- नीलिमा कुलकर्णी मॅडम यांनी उत्कर्ष विद्यालयातील वातावरण हे पेरलं की उगवणारे आहे .विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असे वातावरण शाळेमध्ये आहे हे सांगत विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत , आदर्श गुरु हेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शक असतात असे प्रतिपादन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक -कुलकर्णी सर यांनी गुरूंचा आदर राखा व पंचसूत्रीतील सायं वंदना ,मोठ्यांचा आदर राखा, सुसंस्कारित व्हा कुल पद्धत बळकट करा असे विद्यार्थ्यांना आव्हान केले.
कार्यक्रमाचे आभार आलिया तांबोळी हिने तर कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन – सातवीतील स्नेहल जानकर व आलिया तांबोळी हिने उत्तम रित्या केले. वरील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक अनुराधा लिंगे मॅडम, कुल प्रमुख- शितल भिंगे ,रेश्मा सर्वगोड मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे उत्तम असे नियोजन गंधर्व कुलातील सर्व विद्यार्थ्यांनी केले होते.