फॅबटेकच्या किरण मोहिते या विद्यार्थिनीची महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या राज्य विक्रीकर निरीक्षक पदी निवड
सांगोला: फॅबटेक एज्युकेशन सोसायटी संचलित, फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
अँड रिसर्चच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या विभागातील माजी
विद्यार्थिनी किरण मोहिते हिची महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या राज्य
विक्रीकर निरीक्षक पदी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. आर.बी शेंडगे यांनी दिली. या वेळी किरण मोहिते यांचा
सत्कार संस्थेचे चेअरमन श्री. भाऊसाहेब रुपनर यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री
दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे उपस्थित होते.या सर्वानी
तिचे अभिनंदन करून पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.
किरण मोहिते या सन २०१५ सालच्या बॅचच्या असून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स
आणि टेलिकम्युनिकेशन विभागातून आपले बीटेक पदवीचे शिक्षण पूर्ण केले
होते. यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त करताना विद्यार्थ्यांना
स्पर्धात्मक परीक्षेच्या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या
यशाची गुरुकिल्ली हि कष्ट आणि अभ्यासाचे सातत्य या बद्दल सांगून
परीक्षेच्या मुद्यावर व महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या अभ्यासक्रमाबद्दल
सविस्तर माहिती दिली. तसेच योग्य पुस्तकांची निवड कशी करायची याची
माहिती देऊन अभ्यासामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे. त्याच बरोबर
महाराष्ट्र लोक सेवा आयोगामध्ये विविध संधीची माहिती त्यांनी
विद्यार्थ्यांना दिली. तसेच विद्यार्थ्याबरोबर सविस्तर चर्चा केली. या
यशामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागातील प्राध्यापकांचे
मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ रवींद्र शेंडगे, प्रा. टीएन
जगताप, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख प्रा. धनश्री
राऊत, प्रा. पल्लवी बिले, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेत्तर
कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाची
प्रस्तावना व आभार प्रा. प्रियांका पावसकर यांनी केले .