नाझरा(वार्ताहर) विद्यामंदिर इंग्लिश मेडीयम स्कूल नाझरा मध्ये श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त फॅन्सी ड्रेस कॉम्पटिशन व दही हंडी सोहळा उत्साहात संपन्न. प्रथम गुरुवर्य बापू साहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
यावेळी नाझरा विद्यामंदिर प्रशाला व जुनिअर कॉलेज चे पर्यवेक्षक धायगुडे सर व नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील तसेच फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन साठी प्रमुख पाहुणे म्हणून सुमित्रा लोहार नाझरा ग्रामपंचायत सदस्या,आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच रुकैया मुलाणी व नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्रा. महेश विभुते हे परीक्षक म्हणून उपस्थित होते.
सदर कार्यक्रमांमध्ये मुलांनी राधाकृष्ण, भगतसिंह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वकील,डॉक्टर,शेतकरी,पोलीस,आर्मी शिक्षक,परी,अशा विविध वेशभूषा केल्या होत्या.तसेच इयत्ता चौथी मधील विद्यार्थिनी कुमारी श्रेया रवी चव्हाण हिने बेटी बचाव चा मेसेज देणारी वेषभूशा केली होती.रिमझिम पावसाचा आनंद घेत बाल गोविंदानी दहिहंडी फोडली.
श्री कृष्ण जन्माष्टमी बद्दलची माहिती व सूत्रसंचालन कु. पल्लवी शिंदे यांनी केले . तसेच आभार कु. ज्योती जाधव यांनी मांडले. त्याचबरोबर कु. लोखंडे मॅडम,कु.कांबळे मॅडम, कु . सरगर मॅडम, कु. कोळेकर मॅडम, कु. ऐवळे मॅडम तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी परीश्रम घेतले..