सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

सांगोला विद्यामंदिर येथे करिअर गाईडन्स व रोजगार या विषयावर व्याख्यान संपन्न

सांगोला विद्यामंदिर येथे मुख्यमंत्री स्वच्छता अभियाना अंतर्गत माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाच्या माध्यमातून रोजगार व व्यवसाय शिक्षण या संदर्भात प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून सांगोला तालुक्याचे समन्वयक म्हणून सांगोला शहरातील सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
यावेळी ते बोलताना सांगोला विद्यामंदिर मुळे माझी ओळख पूर्ण समाजामध्ये निर्माण झाली. खरंतर गुरुजनांमुळे प्रेम संस्कार आदर चारित्र्य इत्यादी सामाजिक माणसं म्हणून उंची प्राप्त झाली. आज 14 फेब्रुवारी हा दिवस असला तरी विद्यार्थ्यांनी प्रेम हे आपले आई-वडील गुरुवर्य यांच्या संस्काराच्या शिदोरीवर करावे जीवनामध्ये निश्चितपणाने चांगले व्यक्तिमत्व घडेल. त्यांनी दिलेले संस्कार हीच आयुष्यभर न संपणारी संपत्ती आहे. विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षण न घेता व्यवसायिक शिक्षण घेतल्यास स्वावलंबी होता येईल. यासाठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरीब पीडित मुलांसाठी व्यवसायिक शिक्षणाची दारी नेहमीच खुली असतील विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने केले पाहिजे. असे यावेळी त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शहिदा सय्यद, पर्यवेक्षक बिभीषण माने,सदर कार्यक्रमाची प्रास्ताविक प्राचार्य गंगाधर घोंगडे सर, तर सूत्रसंचालन प्रा राजेंद्र कुंभार, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.एन.डी.बंडगर यांनी  मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!